64 KMPL मायलेज, पाहा 100CC सेगमेंटमधील टॉप 3 स्कूटर
भारतीय टू व्हीलर सेगमेंट खूप मोठं आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्कूटर आणि मोटारसायकलचे पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या 100 सीसी सेगमेंट आणि उत्तम मायलेजसह येतात.
1 / 5
भारतीय टू व्हीलर सेगमेंट खूप मोठं आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्कूटर आणि मोटारसायकलचे पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या 100 सीसी सेगमेंट आणि उत्तम मायलेजसह येतात.
2 / 5
टीव्हीएस स्कूटी झेस्ट (TVS Scooty Zest) हलक्या वजनाची स्कूटर आहे. जी कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये लाँच केली होती. या स्कूटरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यात 109.7 सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजिन दिलं आहे, जे 7.81 पीएस पॉवर 8.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. याच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, ही स्कूटर 62 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. टीवीएस स्कूटी झेस्टची सुरुवातीची किंमत 65,416 रुपये इतकी आहे.
3 / 5
TVS Jupiter : टीव्हीएस जुपिटर ही कंपनीची बेस्ट सेलिंग स्कूटर आहे, जी तिच्या स्टाईल आणि मायलेजमुळे पसंत केली जाते. या स्कूटरच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 109.7 सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर इंजन देण्यात आलं आहे. जे 7.88 पीएस पॉवर आणि 8.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. ही स्कूटर 64 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. हे मायलेज ARAI द्वारा प्रमाणित आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 66,998 रुपये इतकी आहे.
4 / 5
Hero Pleasure Plus : हिरो प्लेजर प्लस एक स्टायलिश आणि वजनाने हलकी स्कूटर आहे. कंपनीने ही स्कूटर चार व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे.
5 / 5
या स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या फ्रंट आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. ज्यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. ही स्कूटर 63 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 62,220 रुपये इतकी आहे.