Bike Maintenance Tips : बाइक-स्कुटी रोज सेल्फ स्टार्ट करता, मग ही बातमी अवश्य वाचा, होणारा खर्च टाळा

| Updated on: Sep 19, 2024 | 1:51 PM

Bike Maintenance Tips : तुम्ही तुमच्या वस्तूंवर प्रेम करता, मग त्यांची काळजी घेणं सुद्धा तितकच आवश्यक आहे. जर लक्ष दिलं नाही, तर पाहता, पाहता तुमच्या वस्तू खराब होतील, तुम्हाला समजणार सुद्धा नाही. Bike आणि Scooter चालवताना अशा काही चुका होतात. त्यामुळे खर्च वाढू लागतो. अशा कुठल्या चूका आहेत, ज्या तुम्ही टाळू शकता, त्या बद्दल जाणून घ्या.

Bike Maintenance Tips : बाइक-स्कुटी रोज सेल्फ स्टार्ट करता, मग ही बातमी अवश्य वाचा, होणारा खर्च टाळा
Scooter Maintenance Tips
Image Credit source: Freepik
Follow us on

काही लोक आपल्या Mobile वर, तर काही लोक आपल्या Car, Bike आणि Scooter वर भरपूर प्रेम करतात. जणू, या वस्तुंमध्ये त्यांचा जीव आहे असं वाटतं. पण तुम्ही त्या वस्तूंवर प्रेम केलं म्हणून काही होणार नाही. तुम्हाला या वस्तू नेहमी चांगल्या कंडीशनमध्ये हव्या असतील, तर त्यांच्या मेन्टेन्सवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही तुम्हाला Motorcycle आणि Scooter चालवणारे लोक कोणती चूक करतात? त्यामुळे त्यांच्या बाइक आणि स्कूटीचा खर्च वाढू लागतो, त्या बद्दल सांगणार आहोत. शब्बीर ऑटोमोबाइल (मधु विहार, आयपी एक्सटेंशन दिल्ली) चे मालक अनिल कुमार यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “ऑटो कंपन्यांनी बाइक आणि स्कुटीमध्ये सेल्फ स्टार्ट फीचर द्यायला सुरुवात केलीय, तेव्हापासून सेल्फ स्टार्टला पहिली पसंती असते. पण याच छोट्याशा चुकीमुळे बाइक आणि स्कूटर खराब होऊ शकते”

हैराण झालात ना, तुम्हाला प्रश्न पडला असेल, सेल्फ-स्टार्टमुळे बाइक किंवा स्कुटीच कसं नुकसान होऊ शकतं? अनिल कुमार म्हणाले की, “जर तुम्ही दर दिवशी सेल्फ स्टार्ट करत असाल, बाइक आणि स्कुटीला दिलेल्या किकचा वापर करत नसाल, तर किक जाम होऊ लागते. किक एकदिवसात जाम होत नाही. जर एखादी व्यक्ती सलग 3-4 महिने सेल्फ स्टार्ट करत असेल, किकचा वापर करत नसेल, समजा एखादा दिवस स्कुटी सेल्फ स्टार्ट झाली नाही, तेव्हा किक सुद्धा जाम झालेली असेल. मग, अशावेळी बाइक किंवा स्कूटी कशी स्टार्ट करायची याचा विचार केलाय का?”

हा खर्च कसा टाळायचा?

अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाम झालेली किक दुरुस्त करण्यासाठी 150 ते 250 रुपये खर्च येतो. हा खर्च कसा टाळायचा? तो मार्ग अनिल कुमार यांनी सांगितला. त्यांनी सांगितलं की, दरदिवशी कमीत कमी एकदा किकने बाइक किंवा स्कुटी स्टार्ट करा. त्यामुळे किक जाम होणार नाही.

हे काम सकाळीच करा

दर दिवशी सकाळी तुम्ही बाइक किंवा स्कुटी सेल्फ स्टार्ट ऐवजी किकने चालू करा, ते योग्य राहील. दिवसभरात नंतर किक स्टार्ट करु असा विचार करत असाल, तर अनेकदा माणूस विसरुन जातो किंवा शारीरिक कष्टांमुळे नंतर कंटाळा येतो. म्हणून सकाळी पहिल्यांदा गाडी सुरु करताना किक स्टार्ट करावी. म्हणजे किक जॅम होणार नाही.