5000 रुपयांमध्ये Tiago CNG आणि Tigor CNG चं बुकिंग सुरु
टाटा मोटर्स आपल्या एंट्री लेव्हल कारचे सीएनजी व्हेरिएंट तयार करत आहे, जे या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे. कार निर्मात्या कंपनीने सीएनजीवर चालणाऱ्या टियागोची रोड टेस्ट सुरू केली आहे.
1 / 6
टाटा मोटर्स आपल्या एंट्री लेव्हल कारचे सीएनजी व्हेरिएंट तयार करत आहे, जे या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे. कार निर्मात्या कंपनीने सीएनजीवर चालणाऱ्या टियागोची रोड टेस्ट सुरू केली आहे.
2 / 6
रस्त्यावर दिसलेली कार एक मिड-स्पेक व्हेरिएंट आहे आणि ब्राइट रेड पेंट स्कीम सह पाहायला मिळाली. टियागोच्या सध्याच्या पेट्रोल मॉडेलमध्ये हा रंग आधीच उपलब्ध आहे.
3 / 6
दिवाळीत हे वाहन लाँच केले जाईल पण कंपनीने आधीच टियागो सीएनजीचे बुकिंग सुरू केले आहे. याशिवाय, तुम्ही 5000 रुपये देऊन Tigor EV देखील बुक करू शकता. दोन्ही वाहनांच्या बुकिंगची रक्कम सारखीच आहे.
4 / 6
टियागोच्या फ्रंटला ट्राय-एरो थीम फ्रंट ग्रिल मिळेल. यासह, यात प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, फॉग लॅम्प, शार्क फिन अँटेना, एलईडी हाय माउंट स्टॉप लॅम्प, एलईडी टेल लाइट आणि इतर वैशिष्ट्ये मिळतील.
5 / 6
या कारच्या केबिनचा तपशील उपलब्ध नाही, पण त्याचे इंटिरियर सध्याच्या पेट्रोलवर चालणाऱ्या मॉडेल्ससारखेच असेल. टियागो व्यतिरिक्त, टाटा इतर कारमध्ये सीएनजी पर्याय देण्याची योजना आखत आहे. यात टिगॉर, अल्ट्रॉझ आणि नेक्सॉन एसयूव्हीचा समावेश असू शकतो. यापैकी Tigor EV लाँच केली आहे.
6 / 6
वाहनात 1.2-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येईल. हे इंजिन जास्तीत जास्त 85bhp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तथापि, सीएनजीवर चालणारे युनिट यापेक्षा कमी आउटपुट देऊ शकते.