गर्मीच्या सीजनमध्ये कारच्या AC मुळे मोठा दिलासा मिळतो. मात्र, कधी-कधी गरजेपेक्षा जास्त कुलिंग होतं. इतकं कुलिंग प्रकृतीसाठी चांगलं नाहीच. पण हे बिघाडाचे संकेत असतात. तुम्ही लहान मुलांसोबत प्रवास करत असाल, तर अडचणी वाढू शकतात. कारचा एसी भरपूर कुलिंग करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. एयर कंडीशनिंग सिस्टिममध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्याने कुलिंग वाढू शकतं. यासाठी समस्येवर लक्ष देणं जास्त गरजेच आहे.
एसीच्या जास्त कुलिंगमुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे एसी टेंपरेचर नेहमी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर, तुमच्या कारचा एसी जास्त कुल होत असेल, तर काही तरी बिघाड असू शकतो. या कमतरतांकडे लक्ष देणं जास्त गरजेच आहे. कुठल्या कारणांमुळे कारमध्ये एसी कुलिंग मोठ्या प्रमाणाच वाढू शकतं, जाणून घ्या.
Car AC जास्त कुल होण्याच कारण
थर्मोस्टेटमध्ये खराबी : थर्मोस्टेट AC च तापमान कंट्रोल करण्यासाठी मदत करतो. हा थर्मोस्टेट खराब झाला, तर AC चुकीच्या पद्धतीने चालू/बंद होऊ शकतो. त्यामुळे जास्त थंड हवा सोडली जाते.
टेंपरेचर सेंसरमध्ये खराबी : टेंपरेचर सेंसर AC ला कारच्या आतील तापमानाचा डेटा देतो. चुकीचा डेटा गेल्यास AC कडून जास्त थंड हवा सोडली जाऊ शकते.
एक्सपेंशन वॉल्वमध्ये खराबी : एक्सपेंशन वॉल्व रेफ्रिजरेंटरला कंट्रोल करतो. हे खराब झाल्यास जास्त थंड हवा सोडली जाते.
एयर ब्लेंडर डोरमध्ये खराबी : एयर ब्लेंडर डोर गरम आणि थंड हवेला मिक्स करतो. तो खराब झाल्यास गरम हवा बंद होऊ शकते. त्यामुळे कुलिंग वाढू शकतं.
रेफ्रिजरेंट गॅस : AC मध्ये रेफ्रिजरेंट गॅस ओवरफील किंवा लीक झाला, तर अडचणी वाढू शकतात. असं झाल्यास AC चा परफॉर्मेंन्स खराब होऊ शकतो. वेगाने जास्त कुलिंग होते.
तुम्हाला तुमच्या कारमध्ये ही समस्या नको असेल, तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. नियमितपणे कार सर्विस करण्याबरोबर एसी सर्विसवर लक्ष दिलं पाहिजे.