Car Buying Tips : सणासुदीचा काळ नसताना, नवीन कार विकत घेताना सर्वात जास्त डिस्काऊंट कसा मिळवाल?

| Updated on: Sep 21, 2024 | 3:01 PM

Car Buying Tips : नवीन गाडी विकत घेताना जास्तीत जास्त पैसे वाचले पाहिजेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण नवीन कार घेताना पैसे कसे वाचतील? हे तेव्हा लक्षात येत नाही. फेस्टिव सीजनमध्ये कार विकत घेऊन बंपर डिस्काऊंट मिळतोच. पण त्या व्यतिरिक्त सणासुदीचा काळ नसताना नव्या कार खरेदीवर जास्तीत जास्त डिस्काऊंट कसा मिळू शकतो? तर त्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Car Buying Tips : सणासुदीचा काळ नसताना, नवीन कार विकत घेताना सर्वात जास्त डिस्काऊंट कसा मिळवाल?
Auto
Image Credit source: Freepik
Follow us on

फेस्टिव सीजन म्हणजे सणासुदीचा काळ येताच ऑटो कंपन्यांचा सेल्स बूस्ट म्हणजे वाढायला सुरुवात होते. असं यासाठी होतं, कारण कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार फेस्टिव ऑफर्स देतात. ग्राहक फेस्टिव ऑफर्सचा फायदा उचलून हजारों-लाखों रुपये वाचवतात. ही झाली फेस्टिव सीजनची गोष्ट.
पण फेस्टिव सीजन नसताना, नवीन कार विकत घेताना सर्वात जास्त डिस्काऊंट कसा मिळू शकतो? आज आम्ही तुम्हाला अशाच काही कामाच्या टिप्स देणार आहोत. फेस्टिव सीजनशिवाय नवीन गाडी विकत घेताना तुम्ही मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करु शकता.

लेफ्ट ओवर स्टॉक

ही टर्म काय आहे? जर तुम्हाला ही टर्म समजली नसेल, तर सोप्या भाषेत समजावतो. उदहारणार्थ, 2024 सुरु आहे. जर कंपनीकडे 2023 च मॉडल असेल, तर तुम्ही हे मॉडल विकत घेऊन लाखो रुपयांची बचत करु शकता. कंपन्या जुना स्टॉक क्लियर करण्यासाठी मागच्यावर्षी निर्मिती झालेल्या कारच्या मॉडल्सवर बंपर डिस्काऊंट ऑफर देते.

Car Insurance Add On

नवीन कार विकत घेताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, शोरुमवाले तुम्हाला इंश्योरेंसमध्ये काही एड-ऑन तर देत नाहीयत ना, ज्याची तुम्हाला गरज नसेल. इंश्योरेंसमध्ये असा एड-ऑन असेल, तर गरज नसलेला एड-ऑन काढून टाका. हे केल्याने तुमच्या पैशांची बचत होईल.

कार इंश्योरेंस

असं आवश्यक नाहीय की, नव्या कारसाठी तुम्हाला शो रुमकडूनच इंश्योरेंस घेतला पाहिजे. तुम्ही बाहेरुन सुद्धा इंश्योरेंस घेऊ शकता. फक्त, अट इतकीच असते की, तुम्हाला नव्या कारची डिलीवरी तो पर्यंत मिळणार नाही, जो पर्यंत तुम्ही इंश्योरेंसची कॉपी दाखवत नाही. शोरुमच्या तुलनेत बाहेरुन इंश्योरेंस करण्याच्या रेटमध्ये बरच अंतर दिसून येतं.

Quotation

अनेकदा असं दिसून येतं की, ग्राहक एका शोरुमच Quotation घेऊन दुसऱ्या शोरुममध्ये जातो. तुम्ही विचार करत असाल, लोकं असं का करतात?. असं केल्याने दुसरे शोरुमवाले तुम्हाला पहिल्या शोरुमपेक्षा चांगला रेट ऑफर करतात. म्हणजे अजून स्वस्त. त्यामुळे हजारो-लाखो रुपयांची बचत होऊ शकते.