नवी दिल्ली : एसबीआय बँकेने (SBI) दिलेल्या धमाकेदार ऑफरमुळे आता तुम्ही थेट टाटा सफारी (Tata Safari) घरी नेऊ शकता. देशतली सगळ्यात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही योनो एसबीआयवर (YONO SBI) टाटा सफारी (Tata Safari) बुक केली तर तुम्हाला कार लोन घेण्यासाठी आकर्षक संधी मिळणार आहे. एसबीआयने ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली आहे. चला टाटा सफारीवर एसबीआयची खास ऑफर काय आहे ते जाणून घेऊया? (car loan book tata safari on yono sbi and get concession zero processing fee and 100 percent finance)
YONO SBI वर तुम्ही टाटा सफारी बुक केलीत तर तुम्हाला यामध्ये व्याजदरावरील 0.25 टक्के सवलत देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रक्रिया शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त योनो एसबीआय वर 100% फायनान्स पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
डाऊनलोड करा अॅप
एसबीआयने ट्विटरवर या ऑफरविषयी माहिती दिली आहे. यामध्ये #TATASafari # YONOSBI # YONO # CarLoan #Offers अशा हॅशटॅगसह हे ट्विट करण्यात आलं आहे. एसबीआयने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Bring home this beast. YONO SBI वर TATA Safari बुक करा आणि तुमच्या कार लोनवर आकर्षक फायदे मिळवा. विचार करणं थांबवा आणि आपल्या स्वप्नांच्या कारसह पुढे जा. आता डाउनलोड करा: https://sbiyono.sbi/index.html
Bring home this beast.
Book a TATA Safari on YONO SBI and avail amazing benefits on your car loan.
Quit thinking and get moving with your dream car.
Download now: https://t.co/NeeHLbqxMh#TATASafari #YONOSBI #YONO #CarLoan #Offers pic.twitter.com/Zb8WC8nZsq— State Bank of India (@TheOfficialSBI) February 5, 2021
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. यामध्ये काही नियम आणि अटीही देण्यात आल्या आहेत. त्या नीट वाचा. ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला एसबीआय योनो अॅपवर लॉगइन करावं लागेल. दुकान आणि ऑर्डर विभागात नेव्हिगेट करा आणि त्यानंतर ऑटोमोबाईल विभागात जा आणि टाटा मोटर्सवर क्लिक करा.
Tata Safari चे फीचर्स
– Tata Safari 2021 SUV मध्ये 2.0 लिटरची क्षमता असलेल्या दमदार Kryotec टर्बो डिझेल इंजिन देण्यात आला आहे. जो 170hp ची पॉवर जेनरेट करतो.
– या गाडीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड टॉर्क कनव्हर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्स फिट करण्यात आला आहे.
– कारच्या पुढच्या बाजुला ट्राई-एरो पॅटर्न असणारी बोल्ड ग्रिल देण्यात आली आहे.
– कारच्या केबिनमध्ये 8.8 इंच फ्लोटिंग आयलँड इंफोटेनमेंट सिस्टम, प्रीमियम 320 वॉट जेबीएल ऑडियो सिस्टम, मूड लायटिंग, 6 वे पॉवर्ड ड्रायव्हर सीटसारखे धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.
– नव्या 2021 टाटा सफारी एसयूव्हीला तीन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये रॉयल ब्लू, व्हाइट आणि ग्रे रंग आहे.
– या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 15 लाख ते 20 लाख रुपये असतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. (car loan book tata safari on yono sbi and get concession zero processing fee and 100 percent finance)
संबंधित बातम्या –
अवघ्या 50 मिनिटात चार्ज होणारी MG Motors ची शानदार कार 8 फेब्रुवारीला लाँच होणार
Mahindra Thar कडून विक्रीचे अनेक रेकॉर्ड्स मोडित, गाडीसाठी तब्बल ‘इतक्या’ महिन्यांचं वेटिंग
बंपर ऑफर! 1 लाखाची बाईक फक्त 40 हजारात
Toyota Fortuner आणि Legender चा मार्केटमध्ये जलवा, एका महिन्यात ग्राहकांकडून हजारो गाड्यांचे बुकिंग
(car loan book tata safari on yono sbi and get concession zero processing fee and 100 percent finance)