नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : जुन्या कारला (Old Car) विकायची प्लॅनिंग करत आहात का? तर खरेदीदार सहज मिळेल. पण कारची चांगली किंमत मिळेल का? कार ट्रान्सफर करणे पण सोपे काम नाही. जुनी कार तुम्ही थेट विक्री करु शकता अथवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करु शकता. बाजारात अनेक कार विक्री करणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तर काही वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या जुन्या कार ग्राहकाकडून खरेदी करुन त्या दुसऱ्यांना पण विक्री करतात. तुमच्या जुन्या कारची चांगली किंमत मिळू शकते. जुन्या कारला चांगला दाम मिळावा ही कोणाची इच्छा नसते. योग्य नियोजन केल्यास तुमच्या जुन्या कारला पण सोन्याचा भाव मिळू शकतो. त्यासाठी काही टिप्स (Used Car Selling Tips)महत्वाच्या ठरतील.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा फायदा काय
ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास कागदपत्रांची झंझट कमी होते. हे काम हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म झटपट पूर्ण करतात. ही थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यासाठी कार मालकाला RTO च्या फेऱ्या माराव्या लागतात. पण त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म काही शुल्क आकारतात.
कार दुरुस्त केली का?
कार विक्री करण्याची तयारी करत असाल तर सर्वात पहिले कार दुरुस्त करणे आवश्यक आहे. किरकोळ दुरुस्ती असली तरी ती झटपट पूर्ण करा. कारचे काही काम बाकी असेल तर ते पण पूर्ण करा. त्यामुळे कार दमदार कामगिरी बजावेल. कारची किंमत वाढेल. कारची रिसले व्हॅल्यू ठरवण्यासाठी मॉडेल, कंडिशन, मायलेज आणि एसेसरीज महत्वाची असते. त्याकडे लक्ष द्या.
अशी मिळेल जुन्या कारची किंमत