मुंबई : Citroen India ने देशात C5 Aircross SUV साठी बुकिंग्स स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. फ्रेंच वाहन निर्माता कंपनीने घोषणा केली आहे की, ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवर 50,000 रुपये इतकी टोकन अमाऊंट भरुन ही एसयूव्ही तुम्ही बुक करु शकता. Citroen C5 Aircross ची बुकिंग करणार्या सुरुवातीच्या ग्राहकांना 50,000 किमी किंवा पाच वर्षाचं मेंटेनन्स (देखभाल) पॅकेज दिलं जाईल. ही योजना 6 एप्रिल 2021 पर्यंत केलेल्या बुकिंगसाठी आणि 30 जून 2021 पर्यंतच्या डिलव्हरींसाठी लागू असेल. (Citroen C5 Aircross Booking With rs 50000 token money Started In India)
Citroen भारताच्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जोरदार मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आता त्यांचं पहिलंच प्रोडक्ट (उत्पादन) C5 एयरक्रॉस प्रीमियम SUV पुढील महिन्यात लाँच करणार आहे. ही फ्रेंच मॅन्युफॅक्चरर भारतात ह्युंदाय Tucson या कारला जोरदार टक्कर देणार आहे. हा ब्रँड गेल्या वर्षीच भारतात डेब्यू करणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे त्यांनी त्यांचा प्लॅन पुढे ढकलला. दरम्यान, या नव्या उत्पादनाच्या प्रोडक्शनचा पहिला लॉट तामिळनाडूमधील प्लाँटमध्ये तयार करण्यात आला आहे.
या गाडीमधील फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास या कारमध्ये तुम्हाला 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल जी अॅपल कारप्ले, एंड्रॉयड ऑटो आणि फोन मिर्रिंग कंपॅटिबिलिटीसह येते. यामध्ये तुम्हाला लेदर सीट्स, डुअल टोन डॅशबोर्ड फिनिश, वर्टिकली प्लेस्ड एयर कंडिशनिंग वेंट्स, पॅनोरमिक सनरूफ आणि फ्रंट विंडो ग्लास मिळतील.
ग्राहकांना या कारमध्ये 12.3 इंचांचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इंजन स्टार/ स्टॉप बटण, हिल होल्ड असिस्ट, रिक्लायनिंग मॉड्यूलर रियर सीट्स, ग्रिप कंट्रोल सिस्टिम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, पार्क असिस्ट, फुट ऑपरेटेड इलेक्ट्रिक टेलगेट, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, एंबियंट लायटिंग, डुअल टोन 18 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आणि मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हील मिळतील.
या कारमध्ये 2.0 लीटरचं फोर सिलेंडर डिझेल इंजिन मिळेल जे 177 PS आणि 400 Nm पीक टॉर्क देईल. या कारच्या अॅव्हरेजबाबत (मायलेज) बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 18.6 किमी प्रति लीटर अॅव्हरेज दिलं जाईल. या गाडीची किंमत 30 लाख रुपयांच्या आसपास असेल.
सीसी 24 चा सामना ह्युंदाय क्रेटा आणि किआ सेल्टोस यांच्याशी होईल, या गाड्या सध्या भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटवर राज्य करीत आहेत. एमजी झेडएस पेट्रोल, स्कोडा, फोक्सवॅगन, मारुती सुझुकी, टोयोटा, टाटा आणि महिंद्रा सारख्या कार उत्पादक कंपन्याही येत्या काही वर्षांत मध्यम आकाराच्या एसयुव्हीला लक्ष्य करू शकतात.
Platina 100 Electric Start चं नवं एडिशन बाजारात, 53 हजारात घरी न्या शानदार बाईक#BajajAuto #BajajPlatina #PlatinaElectricStart https://t.co/4YXjcaq2lb
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 2, 2021
संबंधित बातम्या
Toyota Fortuner आणि Legender चा मार्केटमध्ये जलवा, एका महिन्यात ग्राहकांकडून हजारो गाड्यांचे बुकिंग
Toyota Sales Report | टोयोटा किर्लोस्करचा धडाका, वाहनांच्या विक्रीत 36 टक्क्यांची वाढ
(Citroen C5 Aircross Booking With rs 50000 token money Started In India)