Scooter : ‘या’ आहेत भारतातील सर्वाधिक मार्केट शेअर असलेल्या स्कूटर… कोणाची सद्दी कायम?

| Updated on: May 22, 2022 | 9:53 AM

भारतात पेट्रोलवर चालणार्या स्कूटरची क्रेझ अद्यापही कायम आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये स्कूटरच्या विक्रीमध्ये 25.52 टक्के वाढ झाली आहे. देशात एप्रिल 2022 मध्ये एकूण 3 लाख 46 हजार 325 मोपेड स्कूटर युनिट्‌सची विक्री झाली आहे.

Scooter : ‘या’ आहेत भारतातील सर्वाधिक मार्केट शेअर असलेल्या स्कूटर... कोणाची सद्दी कायम?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : या वर्षी देशात स्कूटरच्या (scooter) विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) वाढते भाव, झिरो मेंटेनंन्स आणि शासनाकडून मिळत असलेल्या सबसिडीमुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. परंतु असे असतानाही भारतात पेट्रोलवर चालणार्या स्कूटरची क्रेझ अद्यापही कायम आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये स्कूटरच्या विक्रीमध्ये 25.52 टक्के वाढ झाली आहे. देशात एप्रिल 2022 मध्ये एकूण 3 लाख 46 हजार 325 स्कूटर युनिट्‌सची विक्री झाली आहे. या लेखातून जाणून घेणार आहोत, की कोणत्या स्कूटरला जास्त मागणी आहे.

ॲक्टिव्हाची सद्दी कायम

भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूरच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी या सर्व भाउगर्दीत ॲक्टिव्हाने आपले मार्केट शेअर कायम ठेवले आहे. होंडा ॲक्टिव्हा पुन्हा एक वेळा देशात सर्वाधिक जास्त विक्री होणारी स्कूटर ठरली आहे. एप्रिल 2022 मध्ये स्कूटरची 1 लाख 63 हजार 357 युनिट्‌सची विक्री झाली आहे. तर मागील एप्रिल 2021 मध्ये केवळ 1 लाख 9 हजार 678 युनिट्‌सची विक्री झाली होती. यंदा यात 48.94 टक्के वाढ झालेली आहे.

ॲक्टिव्हाचा टू-व्हिलरमध्येही दुसरा नंबर

होंडा ॲक्टिव्हा स्कूटर सेगमेंटमध्ये देशात सर्वाधिक विक्री होणार्या स्कूटरशिवाय एप्रिल 2022 मध्ये एकूणच सर्व दुचाकी सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी दुसरी दुचाकी ठरली आहे. देशातील मोपेड सेगमेंटमध्ये ॲक्टिव्हाचे मार्केट शेअरींग तब्बल 47.17 टक्के आहे. एप्रिल 2022 मध्ये विक्री झालेले जवळपास अर्ध्या मोपेड दुचाकी ॲक्टिव्हा होत्या. ॲक्टिव्हा शिवाय कुठलेही मॉडेल एप्रिल 2022 मध्ये 1 लाख युनिटपेक्षा जास्त विक्री करु शकलेले नाही.

हे सुद्धा वाचा

715532

ज्युपिटरची हवा कायम

होंडा ॲक्टिव्हा नंतर टीव्हीएस ज्युपिटर देशात सर्वात जास्त विक्री झालेल्या स्कूटरपैकी एक आहे. तिचा दुसरा क्रमांक लागतो. ज्युपिटरची एप्रिल 2022 मध्ये 60 हजार 957 युनिट्‌सची विक्री करण्यात आली होती. ज्युपिटरने 138.39 टक्के चांगली वाढ नोंदवली आहे. या शिवाय टीव्हीएसने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही आपला दबदबा काय राखला आहे. यासाठी कंपनीने आईक्यूबचे एस आणि एसटी हे दोन व्हेरिएंट आणले आहे.

हे मॉडेल ठरले यशस्वी

एप्रिल 2022 मध्ये सुझुकी एक्सेसच्या विक्रीत 38.20 टक़्के घसरण नोंदवली आहे. परंतु असे असतानाही सुझुकी एक्सेसने 32 हजार 932 युनिट्‌सची विक्री सोबत देशात तिसरा क्रमांक कायम राखला आहे. या शिवाय गेल्या महिन्यात टीव्हीएस एनटॉर्क 25 हजार 267 युनिट्‌स विक्री आणि 26.59 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. होंडा डियो 16 हजार 033 युनिट्‌स विक्री करुन 7.16 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. या दोन्ही गाड्या अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.