देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर चालवलेल्या मर्सिडीजचं वैशिष्ट माहितीये? वाचा

| Updated on: Dec 05, 2022 | 10:06 AM

त्या मर्सिडीजचं नाव आहे बेन्झ जी-क्लास! किंमत आहे फक्त ......../- रुपये!

देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर चालवलेल्या मर्सिडीजचं वैशिष्ट माहितीये? वाचा
नेमकी कोणती आहे ती कार?
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यानचा प्रवास समृद्धी महामार्गावरुन केला. या प्रवासादरम्यान त्यांनी स्वतः गाडी चालवली. ज्या कारमधून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवास केला, ती कार होती मर्सिडीज कंपनीची. या कारचं नाव आणि तिची खास बात काय आहे, हे जाणून घेणार आहोत. समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा शिंदे, फडणवीस यांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेला कार प्रवास सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारा होता.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टिपण्यासाठी माध्यमांचे कॅमेरेही लगबगीने पुढे सरसावले होते. मात्र ज्या गाडीतून हा प्रवास करण्यात आला, ती गाडी नेमकी कशी आहे? तिची किंमत किती? तिचा एव्हरेज किती? या बाबत जाणून घेऊयात.

पाहा देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास केलेल्या या कारचं नाव आहे मर्सिजीड बेन्झ जी क्लास. ही एक एसयूव्ही आहे. ऑफरोडींग करण्यासाठी ही गाडी ओळखली जाते.

मर्सिडीज कंपनीच्या इतर गाड्यांच्या तुलनेत बेन्झ जी क्लासचा लूक हा काहीसा थार, किंवा सुझुकीच्या जिप्सी सारखाही आहे. पण ताकद आणि दर्जाच्या बाबतीत ही गाडी थार आणि जिप्सीच्या तुलनेत फारच उजवी असल्याचं जाणकार सांगतात.

मर्सिडीज बेन्झ जी क्लास ही कार दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 1.72 कोटी रुपयांपासून सुरु होते. डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही फ्युअल ऑप्शनमध्ये ही कारमध्ये उपलब्ध आहे.

देवेंद्र फडणवीस गाडी चालवताना : Video

ही गाडी ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तिचा गिअर बॉक्स हा ऑटो टीसी प्रकारचा आहे. या गाडीच्या पेट्रोल वेरियंटचं नाव जी63 एएमजी 4मेटीक असं असून तिची किंमत 2.55 कोटी इतकी आहे. तर डिझेल वेरिअंटचं नाव जी 350डी 4मेटिक असं असून किंमत 1.72 कोटी रुपये इतकी आहे.

या किंमती एक्सशोरूम असून ऑन रोड किंमत त्यापेक्षा जास्तच असणार आहे. त्यात इन्शूरन्स, रोड टॅक्स आणि इतरही काही गोष्टींचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे या गाडीची किंमत 3 कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकते, असं जाणकार सांगतात.

ही गाडी फोर व्हील ड्राईव्हमध्येही मिळते. 2925 ते 3982 सीसी पर्यंतच्या इंजिनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. 288 ते 577 बीएचपी इतकी जबरदस्त पॉवर या गाडीत असून 600 ते 850 न्यूटन मीटर इतका टॉर्क या गाडीत आहे.

या डिझेल वेरिअंट हे 9 ते 10 किलोमीटर प्रति लीटर इतका एव्हरेज देतं. तर पेट्रोल वेरिअंट हे अवघं 6.1 किलोमीटर प्रती लीटर इतका एव्हरेज देतं. मर्सिडीज ही उच्चभ्रू लोकांसाठी बनलेली कार आहे, असं आधीपासून बोललं जातंय. त्याचं कारण या गाडीच्या किंमतीवरुन स्पष्ट होतं.

ताशी 0-100 किमीचा वेग ही गाडी अवग्या 4.4 सेकंदात गाठते. तर या गाडीचा टॉप स्पीड हा ताशी 240 किमी इतका आहे. एकूण 9 गिअर या गाडीत आहेत.