तुमच्याकडे Ola Electric Scooter आहे का? लगेच हा बदल करा फुकटात, कंपनीकडून सूचना जारी

| Updated on: Mar 15, 2023 | 5:12 PM

तुमच्याकडे ओला इलेक्ट्रिक स्कुटर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीला गेल्या काही दिवसात एका तक्रारीने ग्रासलं होतं. त्यानंतर कंपनीने सूचना जारी केली आहे.

तुमच्याकडे Ola Electric Scooter आहे  का? लगेच हा बदल करा फुकटात, कंपनीकडून सूचना जारी
Free Of Cost: ओला इलेक्ट्रिक स्कुटर असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी, गाडीत असा बदल करण्याची कंपनीकडून सूचना
Image Credit source: Ola Electric
Follow us on

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यात ओला इलेक्ट्रिक स्कुटरची मागणी वाढली आहे. ओलाने इलेक्ट्रिक व्हेईकल पोर्टफोलियोमध्ये एस 1 एअर, एस1 आणि एस 1 प्रो स्कुटर सादर केल्या आहेत. कंपनीच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये, एस 1 च्या 2kW ची किंमत 89,000 आणि 3kW ची किंमत 1,07,999 रुपये इतकी आहे. तर एस 1 प्रोची किंमत 1,28,999 रुपये इतकी आहे. तुमच्याकडे ओला एस1 आणि एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कुटर असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीने या दोन स्कुटरबाबत मोठी घोषणा करत ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कंपनीने फ्रंट फोर्क डिझाईन बदललं आहे आणि अपग्रेडेड फोर्क असं नाव दिलं आहे. इलेक्ट्रिक टू व्हिलर मॅन्युफॅक्चररच्या म्हणण्यानुसार या नव्या डिझाईनमुळे स्कुटर आणखी मजबूत आणि टिकाऊ होईल. महत्त्वाचं म्हणजे ओला एस 1 आणि एस 1 प्रो स्कुटर मालकांना हा अपग्रेडेड फोर्क फुकटात बदलून मिळणार आहे.

गाडीत हा बदल करण्यासाठी 22 मार्चपासून अपॉईंटमेंट विंडो ओपन केली जाईल. या प्रोसेसबाबत कंपनी लवकरच माहिती देणार आहे. यासाठी कंपनीने एक निवदेन जारी केलं आहे. ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रोमध्ये सिंगल साईड फ्रंट फोर्क डिझाईनचा वापर केला जातो. याचा पुरवठा गॅब्रियलकडून होतो. ओला एस 1 एअरमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्कचा वापर करण्यात आला आहे.

“गाडीच्या फ्रंटला असलेल्या फोर्क आर्मच्या सुरक्षेबाबत लोकांमध्ये चिंता आहे. पण खरं सांगायचं तर त्यात काहीच तथ्य नाही. कंपनीत फ्रंट फोर्क आर्मसहित स्कुटरच्या सर्व पार्टची टेस्टिंग एक्सटेंसिव कंडिशनमध्ये होते. गाडीवर लादलेल्या वजनासह सेफ्टी फॅक्टरसह याची निर्मिती केली जाते.”, असं कंपनी आपल्या निवेदनात म्हंटलं आहे.

“आम्ही तुम्हाला पर्याय देत आहोत की, असं काही वाटत असेल तर तुम्ही फ्रंट फोर्क अपडेट करू शकता. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तुम्ही तुमच्या नजीकच्या ओला एक्सपियरन्स सेंटरमध्ये अपॉईंमेंट बूक करु शकता.”, असंही कंपनीने पुढे निवेदनात म्हंटलं आहे.

दुसरीकडे, ओला इलेक्ट्रिक स्कुटर चालवताना खड्ड्यात आदळल्यास फ्रंट फोर्क तुटल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. तसेच स्कुटर मालक जखमी झाले आहेत. आता कंपनीने तो भाग वाढवत सस्पेंशनपर्यंत मोठा केला आहे.
मार्च 2023 पासून देशात 500 ठिकाणी एक्सपिरियंस सेंटर ओपन केले जाणार आहेत. यासाठी ग्राहकांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागेल.