मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कार निर्माती कंपनी जॅग्वार लँड रोवर इंडिया (Jaguar Land Rover India) कंपनी भारतात त्यांची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार आहे. (Electric Jaguar I-Pace will not launch in India on March 9 know exact launch date and price)
जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने (Jaguar Land Rover India) त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही आय-पेस (Electric Jaguar I-Pace) 9 मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा केली होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जॅग्वार आय-पेससाठी अजून काही आठवडे वाट पाहावी लागेल. कारण ही कार आता 23 मार्च 2021 रोजी लाँच केली जाणार आहे, अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, जॅग्वार लँड रोवरने (जेएलआर) आधीच या मॉडेलसाठी बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
लँड रोवर डिफेंडरचे डिजिटल वेरिएंट सादर केल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता भारतात Jaguar I-Pace च्या लाँचिंगसाठी कंपनी उत्सूक आहे. Jaguar I-Pace मध्ये 90kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे जी 100kW रॅपिड चार्जरद्वारे 80 टक्के चार्ज करण्यासाठी केवळ 45 मिनिटं लागतील. या गाडीमध्ये असलेली लिथियम आयन बॅटरी इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे 400 पीएस पॉवर देते. कंपनीने आय-पेसच्या ग्राहकांना चार्जिंगची बेस्ट सुविधा देण्यासाठी टाटा पॉवरशी भागीदारी केली आहे.
आय-पेस च्या 90 केडब्ल्यूएच लिथियम आयन बॅटरीवर 8 वर्षांची किंवा 1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी दिली आहे. सोबतच आय-पेसचं पाच वर्षांसाठी सर्विस पॅकेज दिलं जाईल. ही कार तीन वेरिएंट्समध्ये सादर केली जाईल. त्यामध्ये एस, एसई आणि एचएसई अशी या तीन वेरिएंट्सची नावं आहेत. ही कार 4.8 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रति तास इतका वेग पकडू शकते. जॅग्वारच्या आय-पेसच्या फ्रंट साईडला दोन सिंक्रोन्स मॅग्नेटिक इलेक्ट्रिक मोटर्ससह रियर एक्सलही मिळेल, जे 696 एनएम पीक टॉर्कसह 395 बीएचपी पॉवर आउटपुट जनरेट करेल. यामध्ये AWD (All-wheel drive) सिस्टिमही दिली जाईल. ही 480 हून अधिक किलोमीटपर्यंतची रेंज देईल.
All-Electric Jaguar I-PACE. Arriving in India on 23rd March.
Jaguar India has provided a one-stop solution for your charging needs, with a 7.4 kW AC Wall Box Charger that comes complimentary with your EV. Know more: https://t.co/I7KAUNfcnH#FutureIsElectric #WhyElectrify pic.twitter.com/6kfLrUuZSM— Jaguar India (@JaguarIndia) March 4, 2021
इतर बातम्या
नवी Tata Tiago भारतात लाँच, कमी किंमतीत जास्त फीचर्स मिळणार
Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी
Hyundai ची नवी कार लाँचिंगसाठी सज्ज, i20 Active ला पर्याय?
(Electric Jaguar I-Pace will not launch in India on March 9 know exact launch date and price)