Smart Phone Tips: स्मार्टफोनच्या स्मार्ट लाईफसाठी आजच ‘या’ सवयी सोडा, स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर करा

| Updated on: May 23, 2022 | 4:26 PM

अनेक छोटी-मोठी कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून होतात. कोरोना काळात तर मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनची नितांत गरज भासली किंबहुना ज्यांच्याकडे अद्यापही स्मार्टफोन नव्हता अशांनी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनची खरेदी केली. त्यामुळे कोरोना काळात स्मार्टफोनचे महत्व अधोरेखित झाले.

Smart Phone Tips: स्मार्टफोनच्या स्मार्ट लाईफसाठी आजच ‘या’ सवयी सोडा, स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर करा
Follow us on

सध्याच्या आधुनिक युगात आपण स्मार्टफोनशिवाय (smartphone) आयुष्याचा विचारच करु शकत नाही. स्मार्टफोन नसेल तर, याची कल्पनाच होऊ शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या हातात स्मार्टफोन असतो. अनेक छोटी-मोठी कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून होतात. कोरोना काळात तर मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी (Online education) स्मार्टफोनची नितांत गरज भासली किंबहुना ज्यांच्याकडे अद्यापही स्मार्टफोन नव्हता अशांनी मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनची खरेदी केली. त्यामुळे कोरोना काळात स्मार्टफोनचे महत्व अधोरेखित झाले. परंतु आपल्या अनेक लहान चुकांमुळे स्मार्टफोनची लाइफ कमी होत आहे. आपण अनेकांना अगदी वर्ष, दोन वर्षातच स्मार्टफोन बदलतानाही बघतो, असे का घडते याचा विचार केल्यास याच उत्तर आपल्या चुकीच्या सवयींमध्ये (bad habits) आहे. या लेखात स्मार्टफोनच्या लॉग लाईफसाठी त्याचा कसा वापर करावा, याची माहिती जाणून घेणार आहोत.

चुकीच्या चार्जरचा वापर

सर्व चार्जर एकसारखे असल्याचा गैरसमज अनेकांमध्ये असतो. त्यामुळे अनेक जण मिळेल त्या चार्जरचा वापर करुन चार्जिंग करीत असतात. परंतु हे स्मार्टफोन व त्याच्या बॅटरीसाठी घातक ठरु शकते. स्मार्टफोन नेहमी ओरिजिनल व ब्रॅंडेड चार्जरनेच चार्जिंग केला पाहिजे.

गुगल प्ले स्टोअर शिवाय ॲप डाउनलोड

हे सुद्धा वाचा

युजर्सना अनेक वेळा काही ॲप्स गुगल प्ले स्टोअरवर मिळून येत नाहीत. त्यामुळे ते अनेक वेळा थर्ड पार्टी ॲप्स डाऊनलोड करीत असतात. त्यामुळे अनेकदा स्मार्टफोनमध्ये व्हायरस जाण्याचा धोका निर्माण होत असतो. त्यामुळे मोबाईल खराब होत असतो.

ॲड्रॉइड-सिक्योरिटी ॲप्स डाउनलोड करु नये

मोबाईल निर्मात्या कंपन्या वेळोवेळी स्मार्टफोनमध्ये ॲड्रॉइड ओएस आणि सिक्योरिटी अपडेट्‌स करीत असतात. अपडेट्‌स डाउनलोड केल्याने आपल्या फोनमध्ये नवीन फीचर्स आणि डिझाइन इंस्टॉल होत असतात. तसेच सिक्योरिटी अपडेट्‌स आपल्या मोबाईलमधील खतरनाक ॲप्स आणि इतर धोक्यांपासून वाचवीत असतात. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टम आणि सिक्योरिटी अपडेट्‌सला डाउनलोड करणे गरजेचे आहे.

ॲप्सला अपडेट न करणे

स्मार्टफोनमध्ये जुन्या ॲप्सचे असणेही फोनसाठी धोक्याचे असू शकते. त्यामुळे ॲप्सना नेहमी अपडेट करणे गरजेचे असते. त्यामुळे स्मार्टफोनवर ॲप अपडेटचे नोटिफिकेशन्स आल्यावर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ॲप्स अपडेट केल्याने आपला मोबाईल अधिक सुरक्षीत राहतो.

पब्लिक वायफायचा वापर

पब्लिक वायफाय स्वस्त असल्यासोबतच लवकरच मिळत असतात. परंतु पब्लिक वायफायचा वापर हॅकर्स युजर्सची खासगी माहिती चोरण्यासाठीही करु शकतात. हॅकर्स पब्लिक वायफायला जोडले जान स्मार्टफोनच्या आत प्रवेश करतात व युजर्सच्या खासगी माहितीचा वापर चुकीच्या उद्देशाने करतात.