Ford India कडून कर्मचाऱ्यांना दिलासा, ‘या’ इंजिन प्लांटमधील काम सुरु राहणार

| Updated on: Sep 14, 2021 | 5:34 PM

भारतात उत्पादन बंद केल्यामुळे चर्चेत असलेल्या फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (Ford India Private Limited) आता आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Ford India कडून कर्मचाऱ्यांना दिलासा, या इंजिन प्लांटमधील काम सुरु राहणार
Follow us on

मुंबई : भारतात उत्पादन बंद केल्यामुळे चर्चेत असलेल्या फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (Ford India Private Limited) आता आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. फोर्ड इंडियाच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी आपली योजना तयार केली आहे. कंपनीचे तीन कारखाने बंद झाल्यामुळे त्यांचे कर्मचारी प्रभावित झाले आहेत. कंपनीने त्यांचे चेन्नईतील दोन आणि गुजरातमधील एक कारखाना बंद करण्याचा नुकताच निर्णय घेतला होता. (Ford India Will continue operation at Sanand Engine Plant)

9 सप्टेंबर रोजी फोर्ड इंडियाने 2021 च्या चौथ्या तिमाहीत सानंदमधील वाहन असेंब्ली आणि 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत चेन्नईमध्ये वाहन आणि इंजिन उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, फोर्ड इंडियाने उर्वरित तीन प्लांट बंद करून सानंदमधील इंजिन प्लांटचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सानंद कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस नयन कटेशिया यांनी आयएएनएसला सांगितले की, “सोमवारी सानंद प्लांट व्यवस्थापनाने आमच्याशी चर्चा केली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की कंपनीच्या कारखाने बंद करण्याच्या निर्णयावर आम्हाला काही प्रश्न आहेत का?

नयन कटेशिया यांच्या मते, व्यवस्थापनाकडे कोणतेही उत्तर नव्हते आणि ते परत येतील असे सांगितले. प्रोडक्शन लाईनवर उर्वरित कारची असेंब्ली पूर्ण करण्याचे काम केले जात आहे. इंजिन प्लांट चालू आहे.

फोर्ड हिट की फ्लॉप?

महिंद्रासोबत फोर्डनं बनवलेली पहिली कार होती एस्कॉर्ट. ती फार चालली नाही. नंतर आली IKon. त्यानंतर आणखी डझनभर ब्रँड लॉंच केले गेले. त्यातले काही मॉडेल्स ग्राहकांच्या पसंतीला उतरले, काही आपटले. हिट झालेल्यांपैकी फोर्ड फिगो आणि इकोस्पोर्टस अजूनही रस्त्यावर बऱ्यापैकी दिसतात. पण गेल्या पंचवीस वर्षातलं फोर्डचं गणित मांडायचं तर बहुतांश ब्रँड फ्लॉप गेले. भारतीय बाजारात स्वत:ची जागा निर्माण करण्यात अपयशी ठरले. गेल्यावर्षीचेच काही आकडे बघा. फोर्डला फक्त 48 हजार गाड्या विकता आल्या. चालूवर्षीही फार काही कमाल नाही करता आली. आतापर्यंत फक्त 16 हजाराच्या आसपास गाड्या विकल्या गेल्यात. हा आकडा एकूण मार्केटच्या फक्त 1.84 टक्के इतका आहे. फोर्डच्या तुलनेत अगदी वर्ष दोन वर्षापुर्वी भारतात आलेल्या कंपन्यांच्या गाड्यांची विक्री जास्त आहे. उदाहरणच घ्यायचं तर कियाचं बघा. कियानं 75 हजार गाड्या विकल्यात. सध्या तर कियाचीच सर्वाधिक हवा आहे. त्यामुळेच विक्री नाही म्हणजे तोटा वाढणारच. फोर्डचा गेल्या दहा वर्षातला तोटा आहे 14 हजार कोटी. असं नाही की फोर्डनं स्वत:ला तोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोदींच्याच गुजरातमध्ये 2011 साली फोर्डनं सानंदला नवा प्लांट सुरु केला. काही लाख डॉलर्सची गुंतवणूक केली. पण सगळं उलटं. फोर्ड उभीच राहू शकली नाही. तोटा वाढत गेला.

फोर्ड कुठे चुकली?

फोर्डची सगळ्यात मोठी चूक कुठली असेल तर ती आहे भारतीय बाजार न कळणं. त्यातही भारतीयांची गाड्यांची मानसिकता न कळणं किंवा कळूनही तिच्याकडे दुर्लक्ष करणं. भारत हा अमेरीका नाही. तिथं ग्राहक गाडीचं इंजिन, त्याची साईज अशा तांत्रिक बाबी जास्त पहातात. भारतीय ग्राहक पैशाचा विचार करतो. किंमत किती आहे, मायलेज किती देते, सेकंडहँड म्हणून विकायची ठरवलं तर कितीला जाणार अशा अनेक गोष्टींचा तो विचार करतो.

इतर बातम्या

महिंद्राच्या शानदार SUV वर 2.63 लाखांचा डिस्काऊंट, ऑफरबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Ford India Will continue operation at Sanand Engine Plant)