मुंबई : गेल्या वर्षी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, टोयोटा (toyota)एक डिझेल हायब्रिड पॉवरट्रेनवर काम करत असल्याची माहिती समोर आली होती. आता हे एक माइल्ड-हायब्रिड टर्बो डिझेल पावरट्रेन मॉडेल असल्याचे स्पष्ट होत आहे. फॉर्च्यूनर (Fortuner) या नवीन पावरट्रेनने परिपूर्ण असलेली पहिली टोयोटो एसयुव्ही ठरणार आहे. सर्वात आधी थायलंडमध्ये लाँच करण्यात आलेली इलेक्ट्रिफाइड फॉर्च्यूनर देशात आपल्या सारखी पहिली 7 सीट पिकअप प्लॅटफॉर्म व्हीकल असणार आहे. फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रिड डिझेल (mild hybrid turbo diesel) पावरट्रेनमध्ये 1GD-FTV 2.8 लीटर इंजिनचा वापर करण्यात येणार आहे. याला एक इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेटर मिळण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा इंटीग्रेटर पहिल्यापासूनच सध्याच्या सुझुकी माइल्ड हायब्रिड मॉडलमध्ये उपलब्ध आहे. परंतु यात फरक फक्त एवढाच आहे, की याला डिझेल मोटरसोबत जोडण्यात येणार आहे. Geely Okavango सारखया काही दुसर्या कार्समध्येही ISG चा वापर करण्यात आलेला आहे.
फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रिड डिझेल व्हेरिएंट ब्रेकिंग आणि डिसीलरेशनच्या दरम्यान काइनेटिक एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये बदलण्यासाठी सक्षम ठरणार आहे. फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रड डिझेल पावरट्रेनच्या बाबतीत अजून या व्यतिरिक्त काही अपडेट उपलब्ध नाहीत. पॉवर, टॉर्क, मायलेज आदी गोष्टींची आताच माहिती मिळेल याची माहिती अद्याप लिक झालेली नसली तरी सध्याचे 1GD-FTV 2.8 लीटर इंजिन प्रभावी असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. ही मोटर थाई-स्पेक फॉर्च्यूनर लीजेंडर 4 डब्ल्यूडी व्हेरिएंटसह सादर करण्यात आली आहे. आपल्या सध्याच्या मॉडेलमध्ये इंजिन 204 पीएसची जास्तीत जास्त पॉवर आउटपूट आणि 500 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करता येणार आहे. याला सिक्वेंशियल शिफ्ट आणि पॅडल शिफ्टसह 6 स्पीड एटीसह जोडले जाणार आहे.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, फॉर्च्यूनर माइल्ड हायब्रिड डिझेल व्हेरिएंटला टॉप स्केल लेजेंडर व्हेरिएंटपेक्षा कमी किंमतीत सादर केले जाण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात सर्वाधिक लोकप्रिय हायब्रिड कार्समध्ये एक नवीन मारुती टोयोटा कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. एक कॉमन प्लॅटफॉर्मवर आधारीत मारुती टोयोटा एसयुव्ही आपल्या युनिक स्टाईलसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या कारमध्ये सेगमेंट फर्स्ट सेल्फ चार्जिंग हायब्रिड पावरट्रेनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यातून कारला चांगला मायलेज मिळण्याची शक्यता वाढणार आहे. मायलेजबाबत ग्राहक चांगल्या मायलेजची अपेक्षा नक्कीच करु शकतील. टोयोटाच्या या एसयुव्ही व्हर्जनचे पुढील महिन्यात अनावरण होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे मारुतीचे व्हर्जन सणासुदीच्या दिवसांमध्ये लांच होण्याची शक्यता आहे.