जर तुम्ही आयफोन 12 (iPhone 12) खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. कारण ॲमेझॉनने आपल्या वेबसाईटवर आयफोन 12 वर भरघोस ऑफर उपलब्ध करुन दिली असून याच्या माध्यमातून युजर्स खरेदी करुन पैशांची बचत करु शकणार आहेत. ॲप्पल आयफोन 12 वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटबद्दल (discount) वेबसाइटवर अधिकृत माहिती देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉन (Amazon) वर खरेदी करता येणार आहे. या फोनवर सुमारे 20,000 रुपयांची सूट मिळणार आहे. सोबतच एक्सचेंज ऑफरसह सिटी बँक कार्डवरही अतिरिक्त डिस्काउंट देण्यात आले आहे.
या स्मार्टफोनचे 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 69,900 रुपयांऐवजी 58,999 रुपयांना खरेदी करता येईल. यावर 16 टक्के डिस्काउंट दिली जात आहे. या फोनला अॅमेझॉनवर 5 पैकी 4.6 रेट केले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हा स्मार्टफोन EMI वर देखील खरेदी करता येणार आहे. यासाठी तुम्हाला दरमहा 2,777 रुपये द्यावे लागतील. यामध्ये ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल. याशिवाय 9,150 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल.
एक्सचेंज आणि फ्लॅट डिस्काउंटसह, फोनवर सुमारे 20,000 रुपयांची सूट मिळेल. सिटी बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 1,500 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट दिली जाईल.
फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिसप्ले आहे. तसेच त्यात सिरॅमिक शील्ड प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात A14 बायोनिक चिप देखील आहे. कोणत्याही फोनमध्ये दिलेली ही सर्वात वेगवान चिप आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम आहे. त्याचा पहिला सेंसर 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेंसर आहे आणि दुसरा 12 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा आहे. फोन IP68 वॉटर रेझिस्टन्स बनवला गेला आहे. हे MagSafe अॅक्सेसरीजला सपोर्ट करते.