झिरो डाऊन पेमेंट, परवडणारे हप्ते, दिवाळीला घरी घेऊन या जबदस्त फिचर्स असणारी महिंद्राची SUV

| Updated on: Oct 27, 2021 | 2:18 PM

दमदार फिचर्स असणारी Mahindra kuv 100 दिवाळीला नविन ऑफर घेऊन आपल्या समेर येत आहे.

झिरो डाऊन पेमेंट, परवडणारे हप्ते, दिवाळीला घरी घेऊन या जबदस्त फिचर्स असणारी महिंद्राची SUV
mahindra-kuv
Follow us on

मुंबई : दमदार फिचर्स असणारी Mahindra kuv 100 दिवाळीला नविन ऑफर घेऊन आपल्या समेर येत आहे. टाटा ते महिंद्रा सारख्या ब्रँड्स त्यांच्या छोट्या SUV च्या रेन्जमध्ये देशात झपाट्याने विस्तारत आहे. या सेगमेंटमधील महिंद्रा KUV100, जे त्याच्या आकर्षक डिझाइन आणि चांगल्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध. या गाडीची किंमतसुद्धा 6 लाख रुपयांपासून सुरु होते. सध्या महिंद्राने या कारचे सीएनजी वेरिएंट बाजारामध्ये आणले आहे. या नव्या सीएनजी वेरिएंट किंमत 4 लाखांपेक्षा कमी आहे. या शिवाय कंपनीने या गाडीवर झिरो डाउन पेमेंट आणि सुलभ हप्ते देण्याचा पर्यायही उपलब्ध करुन दिला आहे. जर तुम्ही शोरूममधून Mahindra Kuv 100 खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला 6.08 लाख ते 7.74 लाख रुपये पर्यंत ही गाडी मिळेल.

महिंद्रा kuv 100 चे फिचर्स

महिंद्रा KUV 100 चार प्रकारांसह बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये 1198 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82 पीएस पॉवर आणि 115 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. यात पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही प्रकार आहेत.

कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी ब्लूटूथ आणि AUX कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. ड्रायव्हरच्या सोयीसाठी, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल, उंची अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्पीड सेन्सिंग ऑटोमॅटिक डोअर लॉक, चाइल्ड सेफ्टी लॉक याशिवाय इतर अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. Mahindra kuv 100 च्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर हे पेट्रोल 18.15 kmpl चा मायलेज देते. या कारमध्ये सीएनजीही आहे.

महिंद्रा kuv 100 कार 24 नावाच्या वेबसाइटवर केवळ 3.99 लाख रुपयांमध्ये खरेदी केल्या जाऊ शकतात. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्याचे मॉडेल जानेवारी 2018 आहे. कारने आत्तापर्यंत 32,485 किमी अंतर कापले आहे आणि तिची नोंदणी दिल्लीतील DL-7C RTO मध्ये झाली आहे. ही SUV खरेदी करताना कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देत ​​आहे.

इतर बातम्या :

मुकेश अंबानींची पेट्रोल पंप क्षेत्रात जोरदार एंट्री; वाहनाशी संबंधित सगळ्या सेवा मिळणार एका छताखाली

लहान मुलांसोबत बाईकवरुन प्रवास करताय? स्पीड 40KM पेक्षा जास्त नको, क्रॅश हेल्मेट आवश्यक, जाणून घ्या नवे नियम

1 वर्षाची वॉरंटी, 89 KM मायलेजसह Bajaj ची बाईक अवघ्या 37 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर