मुंबई : युरोपियन कार निर्माता कंपनी स्कोडा (Skoda) 7 सीटर एसयुव्ही (SUV) इलेक्ट्रिक कारच्या कंसेप्टवर काम करीत आहे. नुकतेच, कंपनीने अधिकृतपणे अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीचे नियोजीत स्केच देखील प्रसिद्ध केले आहे. स्कोडाच्या नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीचे नाव Skoda Vision 7S असे आहे. ही 3-रो आणि 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric Car) असेल. कंपनी 30 ऑगस्ट रोजी या इलेक्ट्रिक एसयुव्ही संकल्पनेचे जागतिक पदार्पण करणार आहे. आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची रचना खूपच रग्ड आहे. स्कोडाने आपल्या आतील भागात सीटसाठी तीन रो दिल्या आहेत. नवीन स्कोडा कारमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना कारचा सभोवतालचे लाइट्स आपोआप चालू होतात. या नवीन कारमध्ये अजून काय खास आहे, याची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
1) स्कोडा विजन 7S संकल्पनेचा पुढचा भाग Enyaq पेक्षाही अधिक रग्ड आहे.
2) आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीला दोन चौरस बल्बमध्ये विभागलेला टी-आकाराचा हेडलाइट मिळतो.
3) या कारमध्ये बॉनेट शट-लाइन आणि रंग-कॉन्ट्रास्टिंग ग्रिल एरियासह भुवयासारखे DRLs देखील मिळतात.
4) स्कोडा विजन 7S चे ग्रिल क्षेत्र Enyaq पेक्षा लहान आहे. कॉन्सेप्ट कारमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा देखील आहे.
5) स्कोडाच्या नवीन इलेक्ट्रिक कारला सर्वत्र वळवता येणारा बेल्टलाइन मिळतो.
6) कारच्या मागील बाजूस असलेला स्पॉयलर तिला स्पोर्टियर कारचा लूक देतो.
7) 30 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर पदार्पण करणाऱ्या कंसेप्टमध्ये लो-प्रोफाइल व्हील्स आहेत.
8) नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये सहा अडल्ट आणि एका मुलासाठी जागा आहेत. कारच्या मध्यवर्ती कन्सोलमध्ये चाइल्ड सीट जोडण्यात आले आहे.
9) चाइल्ड सीट पार्ट हा कारचा सर्वात मजबूत भाग असल्याचा दावा स्कोडाने केला आहे
10) हॅप्टिक कंट्रोलअंतर्गत स्टीयरिंग व्हील, डोअर पॅनल आणि व्हर्टीकल स्क्रीनसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे