कार खरेदी करण्याची उत्तम संधी, ही कंपनी देतेय 1 लाखापर्यंत सूट

| Updated on: Oct 30, 2021 | 11:25 PM

ओलाने या प्री-ओन्ड कार फेस्टिव्हलसाठी अनेक उत्तम ऑफर्सही लॉन्च केल्यात. ओला कार फेस्टिव्हलमध्ये सेकंड-हँड वाहन डीलवर उत्तम ऑफर पाहायला मिळतील. या कार फेस्टिव्हलमधून तुम्ही कार खरेदी केल्यास तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.

कार खरेदी करण्याची उत्तम संधी, ही कंपनी देतेय 1 लाखापर्यंत सूट
car loan
Follow us on

नवी दिल्लीः Car Sales: तुम्ही सणासुदीच्या काळात कार खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण खिसा तुम्हाला साथ देत नाही. हरकत नाही, तुम्ही एक नवीन किंवा परफेक्ट वापरलेली कार खरेदी करू शकता आणि तीही अगदी कमी बजेटमध्ये. कॅब एग्रीगेटर कंपनी ओलानेही कार फेस्टिव्हलची घोषणा केलीय. कार फेस्टविलेमध्ये ओला कंपनी वापरलेल्या कारच्या विक्रीवर रोख सवलतीसह अनेक सेवा देत आहे. कंपनीचा दावा आहे की, हा मेळा भारतातील सर्वात मोठा प्री-ओन्ड कार फेस्टिव्हल असेल.

प्री-ओन्ड कार फेस्टिव्हलसाठी अनेक उत्तम ऑफर्सही लॉन्च

ओलाने या प्री-ओन्ड कार फेस्टिव्हलसाठी अनेक उत्तम ऑफर्सही लॉन्च केल्यात. ओला कार फेस्टिव्हलमध्ये सेकंड-हँड वाहन डीलवर उत्तम ऑफर पाहायला मिळतील. या कार फेस्टिव्हलमधून तुम्ही कार खरेदी केल्यास तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. सवलतीसोबतच तुमच्या कारची 2 वर्षांसाठी मोफत सेवा, 12 महिन्यांची वॉरंटी आणि 7 दिवसांची रिटर्न पॉलिसी अशा अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. ओला कार्सचे सीईओ अरुण सरदेशमुख म्हणाले, “ओला कार्स आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत उत्तम ऑफर्स आणि डीलसह नवीन कार खरेदी करण्यापेक्षा वाहन खरेदीचा अनुभव अधिक चांगला बनवणार आहे आणि त्यांच्या ग्राहकांना हा अनुभव घरी बसून घेता येईल.

विमा आणि कार सेवा यांसारख्या सेवा पुरवल्या जातायत

ओलाने ओला कार्स नावाने नवीन वाहन वाणिज्य प्लॅटफॉर्म सुरू केलाय, जिथे तुम्ही नवीन आणि वापरलेल्या दोन्ही कार खरेदी करू शकता. ओला कारच्या ग्राहकांना ओला अॅपद्वारे वाहन खरेदी, वित्त, नोंदणी, विमा आणि कार सेवा यांसारख्या सेवा पुरवल्या जात आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, ओला कार्सने लॉन्चच्या पहिल्या महिन्यात 5,000 गाड्या विकल्यात. ओला कार्स कंपनीने 300 केंद्रांसह 100 शहरांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याची घोषणा केलीय. ओला कार्सची घोषणा करताना संस्थापक आणि सीईओ, भाविश अग्रवाल म्हणाले होते की, ग्राहक वाहने खरेदी, सेवा आणि विक्रीसाठी नवीन मार्ग शोधत आहेत. ते आता पूर्वीच्या रिटेल स्टोअर मोडवर समाधानी नाहीत. ग्राहकांना अधिक पारदर्शकता आणि डिजिटल अनुभव हवा आहे. ते म्हणाले की, ओला कार्सच्या सहाय्याने आम्ही नवीन आणि वापरलेल्या दोन्ही वाहनांची खरेदी, विक्री आणि एकूणच मालकी यांचा एक नवीन अनुभव घेऊन येत आहोत.

संबंधित बातम्या

IOC च्या नफ्यात किरकोळ वाढ, निव्वळ नफा 6360 कोटी रुपये

SBI ची खास सुविधा! आता पेन्शनर्सना व्हिडीओ कॉलद्वारे हयातीचा दाखला सादर करता येणार, जाणून घ्या

Great opportunity to buy a car this company offers discounts up to 1 lakh