Ratan Tata | रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. रतन टाटा 86 वर्षांचे झालेत. त्यांच्या टाटा उद्योग समूहाने जगभरात भारताच नाव उंचावलं. सध्या टाटा ग्रुप स्टील, ऑटोमोबाइल, आयटीसह वेगवेगळ्या क्षेत्रात आपला बिझनेस देश-विदेशात करत आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल रतन यांच्याकडे आज पैसा, प्रसिद्धी आहे, पण ते आजही नॉर्मल कार वापरतात. महत्त्वाच म्हणजे लँड रोव्हर, जॅग्वार या महागड्या कार्सचे मालकी हक्क टाटा ग्रुपकडे आहेत. रतन टाटा यांच्याकडे कुठल्या वेगवेगळ्या कार्सच कलेक्शन उपलब्ध आहे? नॉर्मल म्हणजे ते स्वत: कुठली कार वापरतात? या बद्दल तुमच्या मनात उत्सुक्ता असेल. आम्ही तीच माहिती तुम्हाला देणार आहोत.
टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सने अमेरिकेतील प्रसिद्ध कार कंपनी फोर्डचे दोन ब्रांड लँड रोव्हर आणि जॅग्वारच 2 जून 2008 रोजी अधिग्रहण केलं. रतन टाटा यांच हे पाऊल म्हणजे टाटासह भारतीय वाहन निर्मात्यांसाठी मोठ यश होतं. फोर्डच्या मालकाने अपमानास्पद वागणूक दिली होती. तो हिशोबही या निमित्ताने रतन टाटा यांनी चुकता केला.
कोणती कार चालवतात रतन टाटा?
रतन टाटा यांना अनेकदा होंडाची सिविक सेडान कार चालवताना पाहिलय. अलीकडेच होंडाने ही कार डिस्कंटीन्यू केली. आता रतन टाटा इलेक्ट्रिक कारला प्रमोट करण्यासाठी टाटा ग्रुपची टाटा नेक्सन EV चालवतात. भारतात टाटा मोटर्स सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्सची विक्री करते.
रतन टाटा यांच्या कलेक्शनमध्ये कुठल्या कार्स?
रतन टाटा यांच्याकडे देश-विदेशातील नामवंत कारच कलेक्शन आहे. त्यांच्या ताफ्यात लिमिटेड एडिशन कार क्रिस्लर सेब्रिंग, रोडस्टर स्पोर्ट्स कार कॅडिलॅक एक्सएलआर, मर्सिडीज बेंज एस क्लास, मर्सिडीज बेंज 500 एसएल, लँड रोव्हर आणि टाटा नेक्सन ईवी आहे. भारतात टाटा मोटर्सची मोठी बाजारपेठ आहे. टाटा मोटर्सच्या अनेक कार्सला ग्राहकांची पहिली पसंती आहे.