Marathi News Automobile Have you seen the special features of Hyundais new venue will be available for sale in three engine category
Car : ह्युंदाईच्या नवीन वेन्यूची ‘ही’ खास फीचर्स पाहिलीत काय?
वेन्यू एसयुव्ही मल्टीपल ड्राइव्हसह उपलब्ध होणार आहे. यात अलेक्सा आणि गुगल व्हाइस असिस्टेंट सपोर्टची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. व्हाइस असिस्टेंट 10 विभागीय भाषांना समजण्यासाठी सक्षम राहणार असून यातील साउंड क्वॉलिटीदेखील उत्तम राहणार आहे.
प्रतिनिधीक फोटो
Follow us on
मुंबई : ह्युंदाई (Hyundai) कंपनीने आपल्या सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही वेन्यू फेसलिफ्टला (SUV Venue Facelift) भारतात लाँच केले आहे. यात कंपनीकडून देण्यात आलेली आकर्षक फीचर्स आणि दमदार लूक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. कंपनीने वेन्यू मॉडेलला 2019 मध्ये लाँच केले होते. तीन वर्षांनंतर कंपनीने याच्या डिझाईन आणि स्टाइलमध्ये बदल केलेले दिसून येत आहेत. सोबत टेक्नोलॉजीला (Technology) अपडेट करुन नवीन फीचर्ससह ही कार नव्याने लाँच केली आहे. भारतात या कारची किंमत 7.53 लाख रुपयांपासून (एक्सशोरुम) सुरु होत आहे. या कारमध्ये अन्य कुठले फीचर्स आहेत, त्याची माहिती या लेखातून घेणार आहोत.
नवीन एसयुव्ही वेन्यूमध्ये ग्रीलचे डिझाईन आणि लाइटिंग पॅटर्न न्यू Tucson सारखे दिले आहे. याच्या रियर सेक्शनमध्ये दोन एलईडी लाइट देण्यात आले असून दोन एलईडी टेललाइट्सला ते जोडण्यात आले आहे. याचे रियर बंपन IONIQ इलेक्ट्रिक क्रासओव्हरने प्रभावित झाले आहेत.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, वेन्यू तीन इंजिन कॅटेगिरीसह विक्रीसाठी उपलब्ध होणार असून यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळणार आहे.
1.2 लीटर पेट्रोल युनिट इंजिन केवळ 5 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्ससह येणार असून 1.0 लीटर टर्बो पेट्रोलमध्ये 6 स्पीड iMT आणि ऑटोमॅटीक 7 स्पीड डीसी असे दोन्ही पर्याय मिळणार आहे. तसेच 1.5 लीटर ऑइल बर्नरबाबत बोलायचे झाल्यास हे 6 स्पीड मॅन्यूअल गिअरबाक्ससह उपलब्ध होणार आहे.
ह्युंदाई फेसलिफ्टचे 1.2 लीटर इंजिन मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.53 लाख रुपये आहे. तर टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या मॉडेलची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये (एक्सशोरुम) असणार आहे.
ही एसयुव्ही मल्टीपल ड्राइव्हसह उपलब्ध होणार आहे. यात अलेक्सा आणि गुगल व्हाइस असिस्टेंट सपोर्टची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. व्हाइस असिस्टेंट 10 विभागीय भाषांना समजण्यासाठी सक्षम राहणार असून यातील साउंड क्वॉलिटीदेखील उत्तम राहणार आहे.
ह्युंदाई वेन्यू 30 हून अधिक ॲडव्हांस सेफ्टी फीचर्ससह उपलब्ध होत आहे. यात 6 एअरबॅग, टायर प्रेशर मॉनिटरींग सुविधा असणार आहेत.
आपल्या सेगमेंटमध्ये ही पहिली अशी बजट कार असले ज्यात ड्रायव्हरसाठी पॉवर्ड सीट असणार आहे. सोबत ऑटोमॅटीक चालणारे हेल्थी एअर प्युरीफायर असणार आहे. याशिवाय वायरलेस चार्जर आणि पेडल शिफ्टर्सची सुविधाही मिळणार आहे.