वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे याला पर्याय ठरु पाहणार्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. देशात सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या (Electric car) निर्मितीकडे लक्ष केंद्रीत करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात टाटा मोटर्सचा (Tata Motors) विचार केल्यास कंपनीने सर्वात पहिले आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल केल्या असून इलेक्ट्रिक कार बाजारात टाटाचा दबदबा निर्माण झालेले आहे. कंपनी सध्या इलेक्टिक कार बाजारात आपली नवीन रणनीती आखून काम करीत आहे. टाटाच्या पुढील नवी कॉन्सेप्ट कार (Concept car) ह्या ग्लोबल इलेक्ट्रिक मॉडल फ्यूचर लाइन असलेले जेन 3 मॉडलवर आधारीत राहणार आहे. हा प्लेटफार्म केवळ इलेक्ट्रिक कारला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत टाटाच्या इलेक्ट्रिक कार जुन्या इंधन मॉडलवर आधारीत होत्या. परंतु आता टाटा पूर्णत: इलेक्ट्रिक कार तयार करत आहे.
आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या टाटाच्या इलेक्ट्रिक कार जुन्या कार्सच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या होत्या. परंतु आता जेनरेशन 3 प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक कारला समोर ठेवून बनविण्यात आल्या आहे. याशिवाय कंपनी आपले पुढील मॉडेल केवळ इलेक्ट्रिक कारला अनुसरुन तयार करणार आहे. त्यामुळे साहजिकच या कार इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत वेगळ्या असतील, टाटा Avinya ची काही खास वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
1. नवीन जेन 3 प्लॅटफॉर्मवर तयार झाल्याने या कारमधील इंटीरिअर स्पेस अजून जास्त मिळतो.
2. जेन 3 टेक्नोलॉजीवर आधारी या कारची कमीत कमी रेंज 500 किमी असेल.
3. ग्लोबल लाइनअपसाठी टाटाने प्रीमिअम डिझाइन थीमसोबत या कारला लाँच केले आहे.
4. या कॉन्सेप्ट कारच्या इंटीरिअरमध्ये टिकाउ मेटेरियलचा वापर करण्यात आला आहे.
5. कंपनीने या कारला ईव्ही कारच्या डिझाईनसह लाँच केले आहे.
6. टाटाची ही नवीन जेनरेशन ईव्ही कार 2025 पर्यंत रस्त्यांवर दिसून येईल.
7. ही कॉन्सेप्ट कार ईव्ही शिवाय दुसर्या इंजीन किंवा इंधन व्हेरिएंटमध्ये मिळणार नाही.
8. या नवीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टाटाने एक्सलच्या मधील जागेला पुर्णत वापरले आहे.
9. ही कार 4.3 मीटर लांब असून ती ह्युंडई केटाच्या बरोबरीला आहे.
10. ही कार फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह उपलब्ध होणार असून यात डाइव्हर असिस्टेंस सिस्टीम देण्यात आली आहे.