मुंबई : हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) कंपनी येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून आपल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या किंमती वाढवत आहे. हिरो मोटोकॉर्पने किंमत वाढीच्या निर्णयामागे कमोडिटीच्या किंमती वाढणे हे कारण असल्याचे सांगितले आहे. हिरो मोटोकॉर्पच्या मोटारसायकल आणि स्कूटर सोमवारपासून 3,000 रुपयांनी महाग होतील. किंमतींमध्ये झालेली नेमकी वाढ निवडलेल्या उत्पादनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल. एकंदरीत, जर तुम्ही हिरो मोटोकॉर्प बाईक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोमवारपूर्वी या गोष्टी करा. (Hero MotoCorp to hike prices again by up to INR 3,000)
दुचाकींच्या किंमती वाढल्याने मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हिरो मोटोकॉर्पने म्हटले आहे की, ते सणासुदीच्या काळात आशावादी आहेत. जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीची ऑगस्टमध्ये विक्री ऑगस्ट 2020 च्या तुलनेत 22% कमी झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत एप्रिल-ऑगस्ट FY22 ची चांगली आकडेवारी असूनही एकूण विक्रीवर परिणाम झाला आहे.
तुमच्या आवडत्या मोटरसायकल ब्रँडने काही मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. रॉयल एनफील्डने आपल्या हिमालयन एडीव्हीच्या (Royal Enfield Himalayan ADV) किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यावर्षी जुलैमध्ये दरवाढ केल्यानंतर काही महिन्यांनी ही नवी दरवाढ झाली आहे. नवीन किंमती वाढल्यानंतर, मोटारसायकल आता 2,10,784 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध आहे, ही किंमत आधी 2,05,784 रुपये इतकी होती.
दरवाढीव्यतिरिक्त मोटरसायकलमध्ये इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रॉयल एनफील्डच्या या शानदार बाईकमध्ये 411 सीसी सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन मिळते जे 6,500 आरपीएमवर 24.3 बीएचपी मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. त्याचे इंजिन 4,500rpm वर 32Nm पीक टॉर्क निर्माण करते. रॉयल एनफील्डच्या ADV च्या काही खास वैशिष्ट्यांमध्ये हॅलोजन हेडलाइट, सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, दोन्ही चाकांवर सिंगल डिस्क आणि स्विचेबल ABS यांचा समावेश आहे.
रॉयल एनफील्डने अलीकडेच Meteor 350 मोटारसायकलच्या किंमती देखील अपडेट केल्या. बेस फायरबॉल Meteor 350 ची किंमत आता 1.99 लाख रुपयांपासून सुरू होते, तर मिड-स्टेलर व्हेरिएंटची किंमत आता 2.05 लाख रुपये आहे. टॉप-स्पेक सुपरनोव्हा व्हेरिएंट आता 2.15 लाख रुपये किंमतीला विकले जात आहे, या सर्व किमती एक्स-शोरूम आहेत. क्लासिक 350 चे टॉप-एंड क्रोम व्हेरिएंट देखील त्याच 2.15 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) विकले जात आहे.
टू-व्हीलरप्रमाणे अनेक कंपन्यांनी फोर व्हीलर्सच्या किंमतीतही वाढ केली आहे. किया मोटर्सने (Kia India) त्यांच्या भारतातील दोन सर्वात लोकप्रिय वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत, सेल्टॉस (Seltos) आणि सोनेट (Sonet) या दोन गाड्या महागल्या आहेत. कंपनीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही सोनेटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 6.89 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 13.55 लाख रुपये आहे. त्याच वेळी, सेल्टॉसची सुरुवातीची किंमत 9.95 लाख रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 18.10 लाख रुपये करण्यात आली आहे. किआने दोन्ही वाहनांच्या किमतीत 20 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
किआने सोनेटच्या 1.2 लीटर पेट्रोल आणि 1 लीटर टर्बो पेट्रोल डीसीटी व्हेरिएंटमध्ये 10,000 रुपये आणि 1.5 लीटर डिझेल व्हेरिएंटच्या किंमतीत 20,000 रुपये वाढवले आहेत. तथापि, 1 लीटर टर्बो पेट्रोल डीसीटीच्या जीटीएक्स+ आणि जीटीएक्स+ Dual Tone व्हेरिएंटच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. टर्बोमध्ये फक्त एचटीएक्स व्हेरिएंटची किंमत वाढवण्यात आली आहेत. त्याच वेळी, ही वाढ केवळ सामान्य पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या किंमतीत झाली आहे.
इतर बातम्या
सिंगल चार्जवर 300 किमी रेंज, ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
अवघ्या 1.9 लाखात घरी न्या Maruti Swift, झिरो डाऊनपेमेंटसह ‘इतक्या’ महिन्यांची वॉरंटी
(Hero MotoCorp to hike prices again by up to INR 3,000)