Hero Xpulse 200 4V Dakar Edition: खास बाईकच्या शोधात आहात का? नवीन बाईक घ्यायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुमच्यासाठी खास बाईक घेऊन आलो आहोत. ही बाईक हिवाळ्यात थंडीपासून तुमच्या हातांचे रक्षण करेल. या हिरोच्या नव्या बाईकविषयी जाणून घेऊया.
हिरो मोटोकॉर्पने 200 सीसी सेगमेंटमध्ये नवी बाईक लॉन्च केली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च करण्यात आलेली ही कार ऑफ रोड बाईकिंगचाही आनंद घेते. तसेच यात अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. एक म्हणजे हिवाळ्यात बाईक चालवताना थंडीपासून ही तुमचे रक्षण होईल.
हिरो मोटोकॉर्पने Hero Xpulse 200 4V Dakar Edition लॉन्च केले आहे. यात अनेक फीचर अपडेट्स देण्यात आले आहेत जे हिरो एक्सपल्स 200 4V च्या स्टँडर्ड व्हर्जनपेक्षा वेगळे बनवतात.
Hero Xpulse 200 4V Dakar Edition याच बाईकच्या प्रो व्हर्जनपासून प्रेरित आहे. या बाईकमध्ये तुम्हाला रॅली स्टाईलचे विंडशील्ड आणि नकल गार्ड्स मिळतील. या दोन्ही वैशिष्ट्यांमुळे सुरक्षितता सुधारते, परंतु ते एअरफ्लो देखील वळवतात. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्याचे काम हे फीचर्स करतात. नकल गार्ड देखील विशेषत: दुखापतीपासून आपले संरक्षण करतात.
Hero Xpulse 200 4V Dakar Edition या बाईकमध्ये तुम्हाला 199.6 सीसीसिंगल सिलिंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 18.9 बीएचपीपॉवर जनरेट करेल, तर 17.35 एनएमचा पीक टॉर्क देईल. यामध्ये तुम्हाला 21 इंचाचा फ्रंट व्हील आणि रिअर व्हील मिळेल, ज्यामुळे ऑफ-रोडिंग चांगला अनुभव मिळतो. विशेष म्हणजे यात तुम्हाला स्पोक व्हील्स मिळतील.
Hero Xpulse 200 4V Dakar Edition मध्ये अॅडजस्टेबल फ्रंट सस्पेंशन देण्यात आले आहे, जे 250 मिमी प्रवासास मदत करते. या बाईकची ग्राऊंड क्लिअरन्स 270 एमएम आहे. यात फ्रंट आणि रियरला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. याशिवाय ABS, USB चार्जर सारखे फीचर्स आहेत. तसेच यात रोड, ऑफ रोड आणि रॅली असे तीन राइडिंग मोडही उपलब्ध असतील.
कंपनीने Hero Xpulse 200 4V Dakar Edition लॉन्च केले असून त्याची एक्स-शोरूम किंमत 1.67 लाख रुपये आहे. या बाईकच्या हिरो एक्सपल्स 200 4 व्ही व्हर्जनची किंमत 1.51 लाख रुपये आणि हिरो एक्सपल्स 200 4V प्रो ची किंमत 1.51 लाख रुपये आहे. हिरो मोटोकॉर्पने नुकतीच आपली बाईक एक्सपल्स 200T आणि एक्सट्रीम 200S बंद केली आहे. त्यानंतर आता कंपनीने ही बाईक लॉन्च केली आहे.