नव्या फीचर्ससह Hero Xtreme 160R लिमिटेड एडिशन लाँच होणार, किंमत…

| Updated on: Feb 19, 2021 | 11:23 AM

भारतातील टू व्हीलर मॅन्युफॅक्चरर कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकताच एक मैलाचा दगड पार केला आहे. (Hero Motocorp)

नव्या फीचर्ससह Hero Xtreme 160R लिमिटेड एडिशन लाँच होणार, किंमत...
Follow us on

मुंबई : भारतातील टू व्हीलर मॅन्युफॅक्चरर कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकताच एक मैलाचा दगड पार केला आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे. की, त्यांनी 100 मिलियन (10 कोटी) वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. कोणत्याही कंपनीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. अशातच आता कंपनी लवकरच 6 लिमिटेड एडिशन मॉडल्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक स्पेशल एडिशन असेल. हे स्पेशल एडिशन हिरो एक्स्ट्रिम 160R (Hero Xtreme 160R) या बाईकचं असेल. हे लिमिटेड एडिशन 100 मिलियन या नावाने ओळखलं जाईल. (Hero Xtreme 160R 100 Million Limited Edition revealed: India launch soon)

कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) या ही बाईक लिस्ट केली आहे. वेबसाईटवरील फोटो आणि माहिती पाहून लक्षात येतंय की कंपनीने या बाईकमध्ये काही बदल केले आहेत. त्यापैकी प्रमुख बदल म्हणजे कलर स्कीम. ही बाईक लाल आणि पांढऱ्या रंगाच्या स्कीमसह सादर केली जाणार आहे. या नव्या कलर कॉम्बिनेशनमुळे या बाईकला एक प्रिमियम आणि स्पोर्टी लुक मिळाला आहे.

बाईकमध्ये काय खास असणार?

स्पेशल एडिशन मॉडलमध्ये 100 मिलियन ग्राफिक्स मिळणार आहे, ज्यामुळे ही बाईक रेग्युलर मॉडलपेक्षा वेगळी ठरेल. सोबतच बाईकमध्ये कंपनीने अजूनही काही बदल केले आहेत. 100 मिलियन स्पेशल एडिशनमध्ये तुम्हाला 163cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल जे 15hp पाॉवर आणि 14Nm टॉर्क जनरेट करतं. फीचर्सच्या बाबतीत ही बाईक जुन्या बाईकसारखीच आहे. ज्यामध्ये तुम्हाला एलईडी लायटिंग. नेगेटिव्ह ऑल डिजिटल इंस्ट्रूमेंशन, साईड स्टँड, इंजिन कट ऑफ सारखे फीचर्स मिळतील.

Hero Xtreme 160R सध्या दोन वेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. सिंगल डिस्क आणि ड्यूल डिस्क असे दोन प्रकार सध्या उपलब्ध आहेत. या बाईकची किंमत 1.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. नवं एडिशन बाजारात दाखल झाल्यानंतर त्या बाईकची किंमत जुन्या 160R पेक्षा थोडी जास्त असू शकते. कारण कंपनीने ही बाईक काही प्रमाणात अपडेट केली आहे.

हेही वाचा

अवघ्या 44 हजारात घरी न्या ‘या’ दमदार बाईक्स, तब्बल 90 किलोमीटरचं मायलेज देणार

Bajaj Pulsar 180 नव्या अवतारात कमबॅक करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield धुरळा उडवणार! नवी दमदार बाईक बाजारात येणार

देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक लाँच, केवळ 50 मिनिटात चार्ज होणार

(Hero Xtreme 160R 100 Million Limited Edition revealed: India launch soon)