Honda Amaze ची 11 हजारात करा बुकिंग, ‘या’ तारखेला लॉन्च होणार

| Updated on: Jan 02, 2025 | 4:14 PM

Honda Amaze Launh Date: बाजारात Maruti Suzuki Dzire कारला टक्क देण्यासाठी Honda Amaze येतेय. Honda Amaze 4 डिसेंबरला लॉन्च होणार असून त्याची किंमत जाहीर करण्यात येणार आहे. बुकिंग कशी करावी, फीचर्स कोणते, जाणून घ्या.

Honda Amaze ची 11 हजारात करा बुकिंग, ‘या’ तारखेला लॉन्च होणार
Honda Amaze
Image Credit source: Maruti Suzuki/Honda
Follow us on

Honda Amaze Booking: नवी कार घ्यायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, Honda ची नवी कार बाजारात येत आहे. विशेष म्हणजे Honda ची ही कार Maruti Suzuki Dzire कारला टक्क देण्यासाठी येत आहे. Honda Amaze 4 डिसेंबरला लॉन्च होणार असून त्याची किंमत जाहीर करण्यात येणार आहे.

Honda Amaze चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लॉन्च होणार आहे. 4 डिसेंबरला जपानी कार कंपनी या आलिशान सेडानची किंमत जाहीर करणार आहे. लाँचिंगपूर्वीच या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ती बुक करू शकता.

भारतात Honda Amaze ची टक्कर नुकत्याच लॉन्च झालेल्या Maruti Suzuki Dzire सोबत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन Honda Amaze या कारविषयी सविस्तर.

Honda Amaze ची बुकिंग सुरू केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडक होंडा डीलरशिप्स अधिकृतरित्या Honda Amaze च्या नवीन एडिशनचे बुकिंग करत आहेत. तुम्हीही ही नवी सेडान खरेदी करणार असाल तर जवळच्या डीलरशिपवर जाऊन बुकिंग करू शकता. होंडाने यापूर्वीच नवीन Honda Amaze चा टीझर रिलीज केला आहे.

Honda Amaze चे बुकिंग

नवीन Honda Amaze चे बुकिंग होंडाच्या निवडक डीलरशिपवर 11,000 रुपयांमध्ये सुरू आहे. लाँचिंगनंतर ही कॉम्पॅक्ट सेडान डिलिव्हरीसाठी 20-45 दिवसांपर्यंत थांबू शकते. आगामी Honda Amaze च्या टीझरमध्ये त्याच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलचे इंटीरियर आणि एक्सटीरियर अपडेट केल्याचे दिसत आहे.

नवी Honda Amaze चे फीचर कोणते?

होंडाची नवी Amaze सिल्व्हर, रेड, गोल्डन ब्राऊन, व्हाईट, ग्रे आणि ऑब्सिडियन ब्लू या सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात एलईडी प्रोजेक्टर, एलईडी डीआरएल, नवीन अलॉय व्हील्स सारखे फीचर्स नव्या डिझाइनअंतर्गत मिळू शकतात.

एडीएएस, वायरलेस चार्जर, रियर एसी व्हेंट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट यांसारखे फीचर्सही दिले जाऊ शकतात.

नवी Honda Amaze सध्याच्या 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड थ्री सिलिंडर पेट्रोल इंजिनसह लॉन्च करण्यात येणार आहे. पॉवर ट्रान्समिशनसाठी यात 5 स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय असेल.

Honda Amaze ची प्रतिस्पर्धी कोण?

नवी Honda Amaze भारतात लॉन्च झाल्यानंतर त्याची थेट टक्कर ह्युंदाई ऑरा, टाटा टिगोर आणि मारुती सुझुकी डिझायरशी होईल. मारुतीने नुकतेच डिझायरचे चौथ्या जनरेशनचे मॉडेल लाँच केले आहे, जे 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. नवी होंडा अमेझ व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स अशा तीन ट्रिममध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे.