Hybrid Scooter | ग्राहकांना नो टेन्शन! कंपनी करुन देणार या स्कूटरची दुरुस्ती, परत मागितले 3 लाख युनिट्स

| Updated on: Feb 17, 2024 | 3:27 PM

Hybrid Scooter | Yamaha च्या झेडआर 125 एफआई हायब्रिड आणि फॅसिनो 125 एफआई हायब्रिड स्कूटर मॉडेलच्या काही मॉडेलमध्ये ब्रेक लीव्हरसंबंधी तक्रारी वाढल्या. त्यामुळे कंपनीने त्यांची मोफत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत कंपनीने तीन लाख हायब्रीड स्कूटर दुरुस्तीसाठी परत बोलावल्या आहेत.

Hybrid Scooter | ग्राहकांना नो टेन्शन! कंपनी करुन देणार या स्कूटरची दुरुस्ती, परत मागितले 3 लाख युनिट्स
Follow us on

नवी दिल्ली | 17 February 2024 : इंडिया यामाहा मोटरने मोठा निर्णय घेतला आहे. तुमच्याकडे पण या कंपनीची स्कूटर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने 125 सीसी स्कूटर मॉडल रे जेडआर 125 एफआय हायब्रिड आणि फॅसिनो 125 एफआय हायब्रिडची जवळपास 3 लाख युनिट्स परत मागवल्या आहेत. दुचाकी तयार करणाऱ्या जपानमधील या कंपनीने 1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी, 2024 दरम्यान उत्पादित सर्व स्कूटर तात्काळ परत मागवल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत ज्या ग्राहकांनी या दोन मॉडेलपैकी जी स्कूटर खरेदी केली असेल, त्यांना मोफत रिपेअरिंग करुन मिळणार आहे. तुमच्याकडे ही स्कूटर असेल तर तात्काळ ती कंपनीच्या सेवा केंद्रात घेऊन गेल्यास दुरुस्ती होईल. त्याविषयीची माहिती मिळेल.

  1. ब्रेक लीव्हर नादुरुस्त – या कंपनीने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, मॉडल रे जेडआर 125 एफआय हायब्रिड आणि फॅसिनो 125 एफआय हायब्रिडची जवळपास 3 लाख स्कूटर परत मागविल्या आहेत. जानेवारी 2022 नंतरची मॉडेल परत मागविण्यात आली आहेत. त्यातील काही स्कूटरचे ब्रेक लिव्हर नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे कंपनीने या स्कूटरच्या दुरस्तीची सेवा दिली आहे.
  2. मोफत करणार दुरुस्ती – IYM ने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार ज्या स्कूटरमध्ये हा गडबड, नादुरुस्ती आढळले. त्यासाठीचे पार्ट मोफत उपलब्ध करुन देण्यात येतील आणि दुरुस्ती पण मोफत करण्यात येईल. तुमच्या मनात याविषयीची काही शंका असल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जऊन सेवा हा पर्याय निवडावा. त्याठिकाणी चेसिस क्रमांकाची माहिती दिल्यास योग्य ती माहिती समोर येईल. ग्राहक कंपनीच्या मदत क्रमांकावर अथवा यामाहा सेवा केंद्रावर जाऊन माहिती घेऊ शकतील.
  3. या स्कूटरची काय आहे किंमत – भारतीय बाजारात Yamaha RayZR 125 Fi Hybrid ची एक्स शोरुम किंमत 84,730 रुपयांपासून सुरु होऊन 96,130 रुपयांपर्यंत आहे. या स्कूटरचे मायलेज 71.33 kmpl पर्यंत आहे. तर Yamaha Fascino 125 Fi Hybrid ची एक्स शोरुम किंमत 80,100 रुपये ते 92,830 रुपयांपर्यंत आहे. या हायब्रिड स्कूटरचे मायलेज 68.75 kmpl पर्यंत आहे.
हे सुद्धा वाचा