Hyundai Alcazar : ह्युंदाई अल्हाझारचे नवीन बजेट व्हेरिएंट लाँच… या खास बाबींचा केला समावेश…

| Updated on: Jul 06, 2022 | 3:14 PM

या नवीन व्हेरिएंट कारमध्ये 10.25 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीमच्या जागी 8 इंच स्क्रीनचा पर्याय देखील देण्यात आला असून तो अँड्रोईड ऑटो आणि कार प्ले सपोर्टसह उपलब्ध आहे. यात वाईस कमांडचे ऑप्शनदेखील उपलब्ध आहे. तसेच या ट्रिम्समध्ये पेट्रोल व्हर्जनमध्ये एटीचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

Hyundai Alcazar : ह्युंदाई अल्हाझारचे नवीन बजेट व्हेरिएंट लाँच... या खास बाबींचा केला समावेश...
Hyundai Alcazar
Follow us on

ह्युंदाईने अल्काझारचे (Hyundai Alcazar) नवीन व्हेरिएंट (budget variant) लाँच केले आहे. कंपनीने आपल्या या एसयुव्ही कारचे नवीन बजेट व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीसाठी उपलब्ध करुन दिले आहे. हे एक बेस व्हेरिएंट असणार आहे. याची किंमत 15.89 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत 55 हजार रुपयांनी स्वस्त आहे. ह्युंदाई अल्काझारला कंपनीने क्रेटाच्या यशस्वीतेनंतर अपग्रेट व्हेरिएंटमध्ये सादर केले होते. ही कार सहा सीटर व्हर्जर कार प्रीस्टीज एग्झीक्यूटीव ट्रीम्समध्ये उपलब्ध आहे. यात युजर्सला डिझेल फ्यूअलचा पर्याय मिळणार आहे. जुन्या एंट्री लेव्हलच्या व्हेरिएंटमध्ये 10.25 इंचाचे टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली होती. ही सिस्टीम कार कनेक्टेड टेकसह उपलब्ध आहे. सोबतच यात एलईडी हेडलँप, पॅनारोमिक सनरुफ आणि टायर प्रेशर सेंसर मॉनिटरिंग सिस्टीम (Monitoring system) देण्यात आली आहे.

दरम्यान, या नवीन व्हेरिएंट कारमध्ये 10.25 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीमच्या जागी 8 इंच स्क्रीनचा पर्याय देखील देण्यात आला असून तो अँड्रोईड ऑटो आणि कार प्ले सपोर्टसह उपलब्ध आहे. यात व्हाईस कमांडचे ऑप्शनदेखील उपलब्ध आहे. तसेच या ट्रिम्समध्ये पेट्रोल व्हर्जनमध्ये एटीचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

इंजिनमध्ये कुठलाही बदल नाही

दरम्यान, कंपनीने या अपडेटेड कारच्या इंजिनमध्ये कुठलाही बदल केला नसला तरी, यात 2.0 लीटर एमपीआई फोर सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. यात, 6500 आरपीएमवर 159 पीएसची पावर आणि 4500 आरपीएमवर 191  एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता मिळणार आहे. यात, सहा स्टँडर्ड स्पीड टार्क कंव्हर्टर मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

CRDI इंजिनचा पर्याय उपलब्ध

1.5 लीटर फॉर सिलेंडर टर्बो चार्ज्ड सीआरडीआई डिझेल इंजिन देण्यात आले असून ते 1500 आरपीएमवर 250 एनएमचा पीक टार्क जनरेट करतात. तसेच 4000 आरपीएमवर 115 पीएसची पावर जनरेट करत आहेत. दरम्यान, भारतीय बाजारात ह्युंदाई अल्काझार कारची स्पर्धा टाटा सफारी, एमजी हेक्टोर, महिंद्रा एक्सयुव्ही 500, जीप कॅम्पस, आणि टोयोटा इनोव्हा क्रीस्टा यांच्याशी होणार आहे.