ज्या ग्राहकांना 10 लाखांच्या बजेटमध्ये एक चांगला लूक अन् आकर्षक फीचर्स तसेच उत्तम मायलेज असलेली एसयुव्ही (SUV) खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue) हा एक चांगला पर्याय आहे. ह्युंदाई वेन्यू फेसलिफ्टची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते. E, S, S+/S(O), SX आणि SX(O) सारख्या 5 ट्रिम लेव्हल आणि 16 व्हेरिएंटमध्ये सब कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयुव्ही वेन्यू ऑफर केली जात आहे. या सर्व व्हेरिएंटच्या किंमती 7.53 लाखांपासून ते 12.72 लाखापर्यंत आहेत. नवीन ह्युंदाई वेन्यू पेट्रोल तसेच डिझेल इंजिन आणि मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (Automatic Transmission) पर्यायांमध्ये उपलब्ध असून यातून 23 kmpl पर्यंत मायलेज मिळते.
ह्युंदाई वेन्यू ई पेट्रोल हे सर्वात बजेट मॉडेल आहे ज्याची एक्सशोरूम किंमत 7.53 लाख रुपये आहे. ऑन-रोड किंमत 8,49,778 रुपये आहे. जर तुम्ही ह्युंदाई वेन्यू ई पेट्रोल मॉडेलला 1 लाख (ऑन-रोड प्लस प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा ईएमआय) डाउन पेमेंट देऊन फायनान्स केला तर ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार ग्राहकांना 9.8 टक्के व्याजदराने 7,49,778 रुपयांचे कर्ज मिळेल. यानंतर, पुढील 5 वर्षांसाठी, ग्राहकांना दरमहा 15,857 रुपये ईएमआय भरावा लागेल. ह्युंदाई वेन्यू ई पेट्रोल व्हेरियंटसाठी फायनान्स केल्यास ग्राहकांना 2 लाखांपेक्षा जास्त व्याज लागेल.
ह्युंदाई वेन्यू एस पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 8.70 लाख रुपये आहे असून ऑनरोड किंमत 9,78,742 रुपये आहे. ग्राहक 1 लाख (ऑन-रोड प्लस प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचा ईएमआय) डाउनपेमेंट भरून ह्युंदाई वेन्यू एस व्हेरियंटसाठी फायनान्स करु शकतात. कार देखो ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार ग्राहकांना यानुसार, 8,78,742 चे कर्ज मिळेल. यानंतर, 9.8 टक्के व्याजदरानुसार, 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 18,584 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. ह्युंदाई वेन्यू पेट्रोल व्हेरियंटसाठी फायनान्स केल्यावर ग्राहकांना 2.36 लाखांपेक्षा जास्त व्याज लागेल.