ऑफिस मधून किंवा बाहेरून कुठूनही आल्यानंतर अनेकांना सवय असते की ते आपल्या गाडीच्या चाव्या व्यवस्थित एका जागेवर ठेवतात. पण काही जणांना चाव्या कुठेही ठेवण्याची सवय असते आणि मग जेव्हा चावी हवी असते तेव्हा सापडली नाही की गोंधळ उडतो.ह्या सवयीमुळे कारची चावी हरवण्याची शक्यता असते.कारची चावी हरवणे कोणालाही त्रासदायक ठरू शकते यामुळे ताण येतो आणि दैनंदिन कामावरही याचा परिणाम होतो अशावेळी काय करायचे. या परिस्थितीचा सामना कसा करायचा याबद्दल काही टिप्स जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम तुम्ही घाबरू नका जर तुम्ही घरातून बाहेर पडले नसाल तर कोणताही निष्कर्षावर जाण्यापूर्वी चाव्यांसाठी सर्व खोल्यांची व्यवस्थित तपासणी करा आणि जर तुम्ही तुमच्या चाव्या घेऊन बाहेर पडला असाल तर मागच्या वेळी गेलेल्या सर्व ठिकाणांचा विचार करा आणि त्या ठिकाणी जाऊन चाव्यांचा शोध घ्या.
हरवलेल्या गाड्यांच्या चाव्यांबद्दल तुमच्या कार डीलरला किंवा गाडी ज्या ठिकाणाहून घेतली आहे त्या शोरूमला संपर्क करा. ते तुम्हाला डुप्लिकेट चाव्या किंवा स्पेअर चावी देण्यास मदत करतील.
हरवलेल्या गाड्यांच्या चाव्या गाडी चोरीचा धोका वाढवतात. जर तुमची गाडी चोरीला गेली असेल आणि विमा कंपनीला हरवलेल्या चावी बद्दल माहिती नसेल तर तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे विमा कंपनीला कळवा. त्यानंतर जर तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसी मध्ये चावी रिप्लेसमेंट किंवा रोडसाइड असिस्टंट ॲड – ऑन कव्हर असेल तर तुमच्या हरवलेल्या कारच्या चाव्या बदलण्याचा खर्च विमा कंपनी करेल.
अनधिकृत चाव्या तुमच्या कारच्या लॉकला नुकसान पोहोचवू शकतात चावी तयार करणाऱ्या कडे स्थानिक रित्या बनवलेल्या चाव्या कार अनलॉक करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.त्यामुळे सुरक्षिततेसाठी शक्य तितक्या लवकर लॉक बदला.