Marathi News Automobile In June 2022 these cars became the top 5 best selling cars, Among the best selling cars Maruti Suzuki and Tata have maintained their dominance
Car : जूनमध्ये ‘या’ कार ठरल्या टॉप-5 बेस्ट सेलिंग कार… कोणी कोणाला दिला धोबीपछाड?
मारुती सुझुकीने या वर्षी जून महिन्यामध्ये 12597 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात मारुतीने जून 2021 मध्ये डिझायरची 12639 युनिटची विक्री केली होती. या यादीमध्ये दुसर्या स्थानावर टाटा टिगोरचा क्रमांक लागतो. जून 2022 मध्ये या कारचे 4931 युनिट्सची विक्री झालेली होती. तर गेल्या वर्षी 1076 युनिट्सची विक्री करण्यात आली होती.
देशात सर्वाधिक सेल झाल्या ‘या’ टॉप 5 कार
Follow us on
मुंबई : जूनमधील एकूण विक्री झालेल्या कार्सचे आकडे समोर आले आहेत. यात पहिल्या टॉप 5 बेस्ट सेलिंग कार (Top 5 best selling cars) या सेडन कार ठरल्या आहेत. बेस्ट सेलिंग कारमध्ये मारुती सुझुकीने तसेच टाटा आदींनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. मे महिन्यामध्येही मारुती सुझुकीच्य वेगनआर, बलेनो, स्वीफ्ट, टाटा टिगोर, ह्युंदाईची क्रेटा आदी हॅचबॅक (Hatchback) सेगमेंटच्या गाड्यांची चलती होती. आतादेखील जूनच्या कार सेलिंग अहवाल समोर आला असून त्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) कार विक्रीतील आपली पकड घट्ट ठेवली आहे. या वेळी यादीत टॉपवर मारुती सुझुकीची डिझायर कारने आपले स्थान कायम ठेवले आहे. तर दुसर्या क्रमांकावर टाटाच्या कारचा समावेश करण्यात आला आहे.
1) मारुती सुझुकीने या वर्षी जून महिन्यामध्ये 12597 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात मारुतीने जून 2021 मध्ये डिझायरची 12639 युनिटची विक्री केली होती. मारुती सुझुकीच्या गाड्या नेहमी विक्रीमध्ये अव्वल असतात कंपनीच्या व्हल्यूचा कारच्या विक्रीवर मोठा परिणाम दिसून येत असतो.
2) या यादीमध्ये दुसर्या स्थानावर टाटा टिगोरचा क्रमांक लागतो. जून 2022 मध्ये या कारचे 4931 युनिट्सची विक्री झालेली होती. तर गेल्या वर्षी 1076 युनिट्सची विक्री करण्यात आली होती. टाटा टिगोर एक छोट्या आकाराची कार असून कंपनीने या वर्षी कारचे सीएनजी व्हेरिएंट सादर केले आहे.
हे सुद्धा वाचा
3) ह्युंदाई ओराची जून 2022 मध्ये 4102 युनिट्सची विक्री झाली होती. तर मागील वर्षी या महिन्यात हाच आकडा 3126 इतका होता. ही कार एका आकर्षक डिझाईनमध्ये उपलब्ध असून यात ग्राहकांना चांगला मायलेजही मिळतो. शिवाय कारमध्ये अधिक फीचर्स देण्यात आले आहेत.
4) होंडा कंपनीने जून 2022 मध्ये अमेझची 3350 युनिट्ची विक्री केली. गेल्या वर्षी जून 2021मध्ये कंपनीने 1487 युनिट्सची विक्री केली होती. होंडा अमेझ चांगल्या आकर्षक लूकमध्ये उपलब्ध आहे. यात अतिशय चांगले इंटीरियर देण्यात आलेले आहे.
5) होंडा सिटी, ही एक लोकप्रिय कार आहे. जून महिन्यात कंपनीने याचे 3292 युनिट्सची विक्री केली होती. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 2571 युनिट्सची विक्री करण्यात आली होती.