मुंबई : SUV कार विभागात, जीपची धमाकेदार एन्ट्रीची तयारी करत आहे. जीपने 3 मे पासून आपल्या 7 सीटर कार मेरिडियनसाठी बुकिंग सुरू केले आहे. यासोबतच कंपनीने हे देखील सांगितले आहे की, ही नवीन SUV कार रस्त्यावर कधी दिसायला सुरुवात होईल. ‘एसयूव्ही सेगमेंट’ मध्ये (SUV segment) ही कार थेट ‘टोयोटा फॉर्च्युनर’ आणि ‘एमजीच्या ग्लोस्टर’ शी (MG’s Gloucester) स्पर्धा करेल. 7 सीटर मेरिडियन कारचे बुकिंग 3 मे पासून सुरू होत आहे. जुनच्या मध्यापर्यंत ही कार रस्त्यांवर दिसण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. जागतिक SUV बाजारात आधीच “कमांडर” नावाने मेरिडियन कार विकली जात आहे. या नवीन मॉडेलमध्ये जीपनेही काही बदल केले असले तरी. कंपनीचा दावा आहे की 3 मे पासून बुकिंग सुरू (Booking started) झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत ही नवीन मेरिडियन कार रस्त्यावर दिसायला सुरुवात होईल.
जीपने मात्र मेरिडियन कारची किंमत आणि प्रकार उघड केलेले नाहीत. जीप कंपासच्या प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. नवीन मेरिडियन जीप कंपासच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे पण त्याच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. समोरून, मेरिडियन जीप कंपास सारखा दिसतो. याला लांब व्हीलबेस आणि मागील डिझाइनमध्ये बदल देखील मिळतो. त्याच्या आकारामुळे, मेरिडियन रस्त्यावर चालतांना अत्यंत लक्षवेधी आणि प्रभावी दिसते.
जीप मेरिडियन 10.25 इंच डिजिटल क्लस्टर आणि 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येईल. हे अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेशी कनेक्ट करण्यात सक्षम असेल. याशिवाय समोरच्या दोन्ही सीट इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंट फीचरसह असतील. ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, 6 एअरबॅग्ज आणि हिल स्टार्ट असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल आणि इतर अनेक वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहेत.
समोर आलेल्या रीपोर्टनुसार, कंपनी मेरिडियनमध्ये 2.0 लीटर मल्टीजेट डिझेल इंजिन देत आहे. टाटा हॅरियर आणि टाटा सफारी, जीप कंपास आणि एमजी हेक्टर ट्विन्स हे समान इंजिन आहे. हे इंजिन 170PS ची कमाल पॉवर आणि 350Nm चा पीक टॉर्क देते. कंपनी मेरिडियनला 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 9 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यासोबतच ही SUV फ्रंट व्हील आणि 4 व्हील ड्राइव्हमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक वेगवेगळ्या ड्राइव्ह मोडमध्ये मेरिडियन देखील चालवू शकतील.
इतर बातम्या :