मुंबई : कावासाकी कंपनीने (Kawasaki) अखेर निंजा 300 (Ninja 300) ही बाईक बीएस 6 सह (BS6) भारतात लाँच केली आहे. या बाईकची किंमत 3.18 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कावासाकी निंजा 300 (Kawasaki Ninja 300) ही कंपनीची आत्तापर्यंत सर्वाधिक पसंती मिळालेली बाईक आहे. जुन्या बीएस 4 मॉडेलच्या तुलनेत या बाईकच्या किंमतीत 20 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (Kawasaki Ninja 300 BS6 Launched In India; know price and specs)
2019 मध्ये निंजा 300 बीएस 4 बाईक बंद करण्यात आली होती. त्यांनंतर 2020 मध्ये बीएस 6 मॉडेल आम्ही बाजारात आणू असे कंपनीने जाहीर केले होते. 2020 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत ही बाईक लाँच केली जाणार होती. परंतु कोरोना या साथीच्या आजारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे कंपनीने या बाईकचे लाँचिंग पुढे ढकलले. दरम्यान आता ही बाईक लाँच करण्यात आली आहे. कंपनीकडून या बाईकच्या डिझाईन आणि पॉवरट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
कावासाकी निंजा 300 बीएस 6 ही बाईक 296 cc पॅरलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिनसह सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये आपल्याला 38.4 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क मिळेल. यामधील मोटर 6-स्पीड गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आली आहे ज्यामध्ये आपल्याला एक असिस्ट आणि स्लीपर क्लच देखील मिळेल.
याच वाहनात कंपनीकडून जुन्या मॉडेलप्रमाणे हार्डवेअर देण्यात आले आहे. बाईकच्या पुढील भागात 37mm टेलीस्कोपिक फोर्क आहे, तर मागील भाग मोनोशॉकसह आहे. दुचाकीमध्ये डुअल चॅनल एबीएस उपलब्ध आहे. तसेच कंपनीकडून सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर कन्सोल दिले गेले आहे. बाईकमध्ये 17 इंचाचे व्हील्स आहेत.
कावासाकी निंजा 300 या बाईकची किंमत बीएस 6 व्हर्जनच्या मानाने अधिक आहे. या इंजिनाच्या श्रेणीमध्ये तुम्हाला सिलिंडर टीव्हीएस अपाचे RR 310 आणि केटीएम आरसी 390 (KTM RC 390) देखील मिळेल. निंजा 300 या बाईकची कावासाकीच्या 29 डिलरशिपच्या मदतीने विक्री होईल. ही बाईक तुम्हाला तीन रंगांमध्ये मिळेल. ज्यामध्ये लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि Ebony या रंगांचा समावेश आहे. निंजा 300 स्पोर्ट्सची रचना इतकी आकर्षक आहे की आजही ही बाईक इतर अनेक वाहनांना मागे टाकू शकते.
India Kawasaki Motors announces the launch of MY22 Ninja 300!!
The launching price of the Ninja 300 is starting at INR 3,18,000/-
To know the estimated on-road price of your favorite Kawasaki motorcycle click on the below link:https://t.co/qRhaUAkVqW#indiakawasaki #Ninja300 pic.twitter.com/AwHwNa9Pz6— IndiaKawasaki (@india_kawasaki) March 2, 2021
संबंधित बातम्या
‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, किंमत खूपच कमी
Platina 100 Electric Start चं नवं एडिशन बाजारात, 53 हजारात घरी न्या शानदार बाईक
बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवण्याला प्राधान्य, खर्च किती?
(Kawasaki Ninja 300 BS6 Launched In India; know price and specs)