Kawasaki Versys 650 ची धमाकेदार एंट्री, लूक अन्‌ फीचर्सने जिंकली मनं…

| Updated on: Jun 30, 2022 | 2:30 PM

Versys 650 मध्ये ड्युअल डिस्क ब्रेक देखील मिळणार असून पुढच्या भागात 300 एमएमचे डिस्क आणि मागील भागात 220 एमएमचे डिस्क ब्रेक मिळणार आहेत. यात 21 लीटर इंधन क्षमता असलेले टँक असून बाइकचे एकूण वजन 219 Kg च्या जवळपास असणार आहे.

Kawasaki Versys 650 ची धमाकेदार एंट्री, लूक अन्‌ फीचर्सने जिंकली मनं...
kawasaki
Image Credit source: kawasaki
Follow us on

भारतीय दुचाकी बाजारात सध्या विविध सेगमेंटच्या बाइक्सना (bikes) मोठी मागणी मिळत आहे. दुचाकी निर्मात्या कंपन्या आपल्या अपकमिंग बाइक्समध्ये अनेक नवीन टेक्नॉलॉजीचे फीचर्स आणत आहेत. या सोबतच बाइक्सचा लूकदेखील अधिक आकर्षक करण्याकडे कंपन्यांचा कल आहे. दमदार इंजिन, आकर्षक लूक अन्‌ अपग्रेटेड फीचर्सचा (features) वापर करुन जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न दुचाकी निर्मात्या कंपन्यांकडून होताना दिसत आहे. नुकतेच भारतीय बाइक मार्केटमध्ये Kawasaki Versys 650 ने धमाकेदार एंट्री केली आहे. बाजारात आपला दबदबा निर्माण करण्यात या बाइकला यश आले आहे. कंपनीने या नवीन बाइकमधील स्टाइलिंग आणि फीचर्समध्ये अनेक नवीन अपडेट (Update) केले आहेत, ज्यामुळे ही बाइक अधिक आकर्षक बनते. या लेखातून या बाइकबाबत अधिक माहिती घेणार आहोत.

शार्प स्टाइल

Kawasaki Versys 650 ला शार्प स्टाइलमध्ये लाँच करण्यात आले आहे. यामुळे ही बाइक अधिक आकर्षक दिसून येत आहे. ही बाइक जवळपास Versys 1000 सारखीच आहे. यात एलईडी हेडलाइट आणि 4 Way ॲडजस्टेबल विंडस्क्रीन देण्यात आली आहे. या माध्यमातून हवेपासून सुरक्षा मिळते. सध्या याला दोन रंगांमध्ये सादर करण्यात येत असून यात, लाइम ग्रीन आणि मॅटेलिक फँटम सिल्वर यांचा समावेश आहे.

TFT डिसप्लेने असणार परिपूर्ण

Kawasaki Versys 650 मध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत. यात digi ॲनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर असून 4.3 इंचाचे अपडेटेड TFT कलर डिसप्ले देण्यात आला आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यात, Traction Control सिस्टीमदेखील देण्यात आली आहे.

दमदार इंजिन

अपडेटेड Kawasaki Versys 650 चे इंजिन मॅकेनिकली अनचेंज्ड असले तरी, पहिलेची 649 सीसी लिक्विड कूल्ड पेररल ट्‌विन सिलिंडर इंजिन आहे, जे 66Hp पावर जनरेट करते. ही 8500 RPM क्षमता निर्माण करते. यात 6 मॅन्यूअल गिअर बॉक्स देण्यात आले आहेत.

ड्युअल डिस्क ब्रेकची सुविधा

Versys 650 मध्ये ड्युअल डिस्क ब्रेक देखील मिळणार असून पुढच्या भागात 300 एमएमचे डिस्क आणि मागील भागात 220 एमएमचे डिस्क ब्रेक मिळणार आहेत. यात 21 लीटर इंधन क्षमता असलेले टँक असून बाइकचे एकूण वजन 219 Kg च्या जवळपास असणार आहे.

7.36 लाखांपासून सुरुवात

Kawasaki Versys 650 चे अपडेटेड मॉडेल मागच्या तुलनेत 21 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. या बाइकची सुरुवातीची किंमत 7.36 लाख रुपये आहे. 21 हजार जास्त मोजल्यावर ग्राहकांना ट्रँक्शन कंट्रोल, टीएफटी डिसप्ले, एलईडी हेडलाईटसह अनेक फीचर्स मिळणार आहेत. बाइकची स्पर्धा Triumph Tiger sport 660, Suzuki V Storm 650 XT सोबत होणार आहे.