प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक

| Updated on: Jan 14, 2022 | 1:04 PM

मागील अनेक दिवसांपासून किया (Kia) या कार बनवणाऱ्या कंपनीच्या किया कॅरेन्स या नव्या मॉडेलची अनेकजण वाट पाहत होते. मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून आजपासून या कराची बुकिंग करता येणार आहे. किया इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा डिलरशीप वाल्याकडे जाऊन फक्त 25 हजार रुपये देऊन या कारची बुकिंग करता येईल.

प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक
KIA KAREN CAR
Follow us on

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून किया (Kia) या कार बनवणाऱ्या कंपनीच्या किया करेन्स ( Kia Carens) या नव्या मॉडेलची अनेकजण वाट पाहत होते. मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून आजपासून या कारची बुकिंग करता येणार आहे. किया इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा डिलरशीप वाल्याकडे जाऊन फक्त 25 हजार रुपये देऊन या कारची बुकिंग करता येईल. ही एक प्रीमियम क्लास असलेली एमपीव्ही कार (Premium MPV car) असून सेव्हन सीटर आहे. याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली आहे.

किया मोटर्सने लॉन्च केलेली चौथी एमपीव्ही कार

याआधी किया कंपनीने किया सेल्टॉस, सॉनेट, कॉर्निव्हल असे वेगवगळे मॉडल लॉन्च केलेले आहेत. करेन्स ही किया मोटर्सने लॉन्च केलेली चौथी एमपीव्ही कार आहे. या कारची तुलना मारुती सुझुकी एक्सएल 6 (Maruti Suzuki XL6), महिंद्रा मार्झो (Mahindra Marazzo), टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) आणि ह्युंदाई अल्काझर (Hyundai Alcazar) या कारशी करता येईल.

 कार वेगवेगळ्या रंगात उपलब्ध 

Kia Carens ही कार भारतात एकूण आठ रंगामध्ये उपलब्ध केली जाईल. यामध्ये इम्पीरियल ब्लू, मॉस ब्राउन, स्पार्कलिंग सिल्व्हर, इंटेन्स रेड, अरोरा ब्लॅक पर्ल, ग्रॅव्हिटी ग्रे, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि क्लियर व्हाइट अशा रंगांचा समावेश असेल. या कारची डिझाईन भारतात उपलब्ध असलेल्या एमपीव्ही कारपेक्षा वेगळी असेल.

किया करेन्सचे फिचर्स काय आहेत ?

किया करेन्स या कारला कार प्ले अँड्रॉईड ऑटो आणि कियाच्या UVO कनेक्टीव्हीटीसोबत 10.25 इंची टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. या पूर्ण सिस्टिमध्ये 64-कलर अॅम्बिएंट लाईट असलेले आठ स्पिकर्सचे साऊंड सिस्टिम मिळेल. सिट्संदर्भात बोलायचे झाले तर व्हेंटिलेटेड फ्रन्ट सिट्स, तसेच कप होल्डर्स असलेले सीट बॅक टेबलसुद्धा या कारमध्ये दिले जाईल. मागेच्या ओळीतील सिट्ससाठी इलेक्ट्रिकली पावर्ड वन-टच टम्बल डाउन फीचर असेल. तसेच सिंगल-पॅन सनरूफदेखील या कारमध्ये देण्यात आलेले आहे.

कारमध्ये सहा एअरबॅग्स

सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही या कारमध्ये खबदारी घेण्यात आलेली आहे. या कारमध्ये सहा एअरबॅग्स असणार आहेत. तसेच ABS आणि ESC, हिल-स्टार्ट असिस्ट फीचर यांचा समावेश आहे. कारच्या चारही चाकांना डिस्क ब्रेकची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच रेअर पार्किंग सेन्सरदेखील देण्यात आले आहे.

इतर बातम्या :

शानदार ऑफर! Hyundai i10 अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

अवघ्या 52 हजार रुपयांमध्ये स्पोर्ट्स लूकवाली बजाज पल्सर, जाणून घ्या काय आहे डील

Yezdi Roadster, Scrambler आणि Adventure बाईक्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स