किआच्या ‘या’ कारने जिंकली भारतीयांची मने, दोन वर्षात 2 लाख युनिट्सची विक्री

| Updated on: Aug 22, 2021 | 9:50 AM

किआ इंडियाने (Kia India) शुक्रवारी जाहीर केले की, त्यांच्या ब्रँडचे प्रमुख उत्पादन सेल्टॉसच्या दोन लाख युनिट्सची देशात विक्री झाली आहे.

किआच्या या कारने जिंकली भारतीयांची मने, दोन वर्षात 2 लाख युनिट्सची विक्री
Kia Seltos
Follow us on

मुंबई : किआ इंडियाने (Kia India) शुक्रवारी जाहीर केले की, त्यांच्या ब्रँडचे प्रमुख उत्पादन सेल्टॉसच्या दोन लाख युनिट्सची देशात विक्री झाली आहे. कार निर्मात्या कंपनीने असेही म्हटले आहे की, किआ सेल्टॉस एसयूव्हीने त्यांच्या एकूण विक्रीमध्ये 66 टक्क्यांहून अधिक योगदान दिले आहे. किआने 2019 मध्ये सेल्टॉस या कारद्वारे भारतामध्ये पदार्पण केले आणि गेल्या दोन वर्षांत कार्निवल आणि सॉनेट ही आणखी दोन उत्पादने लाँच केली आहेत. एवढेच नव्हे तर सेल्टॉस कोरियन ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. (Kia India sold over two lakh units of Kia Seltos after 2019 debut in India)

किआने म्हटले आहे की, सेल्टॉसच्या विक्रीत 58 टक्के वाटा हा त्या कारच्या टॉप व्हेरिएंटचा आहे. तर एसयूव्हीच्या ऑटोमॅटिक ऑप्शन्सनेदेखील 35 टक्क्यांहून अधिक योगदान दिले आहे. डिझेल इंजिन असलेल्या सेल्टॉसला मोठी मागणी आहे आणि वाहनांच्या एकूण विक्रीत 45 टक्के वाटा आहे. याशिवाय, असे म्हटले जातेय की, अलीकडेच सादर केलेल्या iMT (क्लचलेस ट्रान्समिशन) ला देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

एकूणच, किआने जवळपास 1.5 लाख कनेक्टेड कार विकल्या आहेत, सेल्टॉसने पुन्हा विक्रीत 78 टक्क्यांहून अधिक योगदान दिले आहे. Seltos HTX 1.5 पेट्रोल व्हेरिएंट हे ग्राहकांच्या पसंतीचे मॉडेल ठरले. किआने असेही म्हटले आहे की, सोनेटचा एकूण विक्रीच्या 19 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे.

किआ इंडियाचे कार्यकारी संचालक आणि मुख्य विक्री आणि व्यवसाय धोरण अधिकारी ताए-जिन पार्क म्हणाले की, ग्राहकांच्या बदलत्या प्रवृत्तीमुळे भारतीय प्रवासी वाहन बाजार बदलत आहे, ज्यात प्रगत वैशिष्ट्यांची वाढती मागणी आणि लेटेस्ट कनेक्टेड-कार तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ते म्हणाले, “आम्ही लोकप्रिय सेगमेंटमध्ये गेम चेंजिंग उत्पादने लाँच करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे, जेणेकरून ग्राहकांना किआच्या मालकीचा संपूर्ण नवीन अनुभव मिळेल.”

देशात एसयूव्हीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किआने सेल्टॉस अॅनिव्हर्सरी एडिशनही सादर केले आहे. किआ इंडियाने अलीकडेच त्यांच्या सोशल चॅनेलवर नवीन कारबद्दल टीझ केलं आहे. व्हिडिओमध्ये प्रोजेक्ट एक्स नावाची कार – किआ सेल्टॉस एक्स लाईनचा विस्तार असू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

इतर बातम्या

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर Tesla Model 3 चं टेस्टिंग, भारतात लाँचिंग कधी?

(Kia India sold over two lakh units of Kia Seltos after 2019 debut in India)