Toyota Fortuner च्या सेफ्टीला तोड नाही! म्हणून वाचले केंद्रीय मंत्र्याचे प्राण

| Updated on: Nov 08, 2023 | 1:53 PM

Toyota Fortuner Safety Features टोयोटा फॉर्च्यूनर एक सुरक्षित कार मानली जाते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या हिशोबाने या कारमध्ये अनेक सेफ्टी फिचर्स आहेत. याच कारमुळे केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल यांचे प्राण वाचले.

Toyota Fortuner च्या सेफ्टीला तोड नाही! म्हणून वाचले केंद्रीय मंत्र्याचे प्राण
toyota fortuner suv car of prahlad patel
Follow us on

मुंबई : केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल यांच्या गाडीला मध्य प्रदेश छिंदवाडा येथे भीषण अपघात झाला. या अपघातातून ते सुदैवाने बचावले. केंद्रीय मंत्री टोयोटा फॉर्च्यूनर SUV मध्ये होते. वेळीच एअरबॅग ओपन झाल्याने प्रह्लाद पटेल यांचे प्राण वाचले. कुठल्याही कारमध्ये एअरबॅगचा एक महत्त्वाच्या सेफ्टी फिचरमध्ये समावेश होतो. अनेकदा भीषण अपघातामध्ये एअरबॅगमुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. टोयोटा फॉर्च्यूनर एका उत्तम SUV आहे. या कारमध्ये 1, 2 नाही, तर 7 एअरबॅग येतात.  मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय मार्केटमध्ये टोयोटा फॉर्च्यूनर एक दमदार SUV म्हणून ओळखली जातेय. बॉलिवूड सेलिब्रिटी ते नेते टोयोटा फॉर्च्यूनरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या लोकप्रिय SUV कारच्या किंमतीसह फिचर्स आणि स्पेसिफिकेशंस समजून घेऊया.

जापानी ऑटो कंपनी फॉर्च्यूनर कारची विक्री करते. या कारमध्ये 2694 cc पेट्रोल आणि 2755 cc डीजल इंजिन येतं. पॉप्युलर एसयूवीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन येतो. डीजल वर्जनमध्ये 2WD/4WD आणि पेट्रोल वर्जनमध्ये 2WD ड्रायविंगचा ऑप्शन मिळेल. ऑफ-रोडिंगसाठी ही एक मजबूत SUV मानली जाते.

Toyota Fortuner : सेफ्टी फीचर्स

टोयोटा फॉर्च्यूनर कारमध्ये तुम्हाला हे सेफ्टी फीचर्स मिळतात.

BA (ब्रेक असिस्ट) सोबत VSC (व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल)HAC (हिल असिस्ट कंट्रोल)

TRC (ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम)

7 (यूनिट) एसआरएस एयरबॅग

अल्ट्रासोनिक सेंसर आणि ग्लास ब्रेक सेंसरसह एंटी थेफ्ट अलार्म

पुढची सीट : WIL कॉन्सेप्ट सीटें [व्हिपलॅश इंजरी लेसिंग]

प्री-टेंशनर + फोर्स लिमिटरसह फ्रंट रो सीटबेल्ट
EBD सह ABS

इमरजन्सी अनलॉकसह स्पीड ऑटो लॉक

इमरजेंसी ब्रेक सिग्नल

Toyota Fortuner ची किंमत

फॉर्च्यूनरमध्ये ऑटो कॉलिजन नोटिकफिकेशन, टो अलर्ट सारखे कनेक्टेड कार फीचर्स मिळतात. ही कार क्रूज कंट्रोल, मोठी TFT मल्टी-इंफोटेनमेंट डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 8.0 DA टचस्क्रीन ऑडियो, प्रीमियम JBL स्पीकर्स सारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. याची एक्स-शोरूम प्राइस 33.43 लाख रुपये ते 51.44 लाख रुपयापर्यंत आहे.