मुंबई : भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक कोमाकी रेंजर (Komaki Ranger) लाँच करण्यात आली आहे. ही बाईक हार्ले डेविडसनसारखी (harley davidson) दिसते. ही इलेक्ट्रिक बाइक सिंगल चार्जवर 180-220 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीनेच केला आहे. यात 4000 वॅटची मोटर देण्यात आली आहे. कंपनीने ही Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या तीन कलर व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.68 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यासोबत कंपनीने कोमाकी व्हेनिसदेखील (Komaki Venice) लाँच केली आहे.
या बाइकमध्ये आयसी इंजिन क्रूझरचा वापर करण्यात आला आहे, जे याआधी हार्ले डेव्हिडसन आणि रॉयल एनफिल्ड इत्यादींमध्ये वापरण्यात आलं आहे. या बाईकमध्ये बिग ग्रॉसर व्हील, क्रोम एक्सटीरियर्स आणि फाइन पेंट जॉबचा वापर करण्यात आला आहे. या मोटरसायकलमध्ये 4kW बॅटरी वापरली आहे, जी भारतातील सर्वात मोठी दुचाकी बॅटरी आहे. त्यामुळे ही बाइक सिंगल चार्जवर 180-200 किमी ड्रायव्हिंग रेंज देते.
या मोटरसायकलला ब्लूटूथ साउंड सिस्टीम, साइड स्टँड सेन्सर, क्रूझर कंट्रोल फीचर्स, अँटी थेफ्ट लॉकिंग सिस्टीम आहे. तसेच, यात ड्युअल स्टोरेज बॉक्सचा पर्याय समाविष्ट आहे. युजर्सची व्यवस्था लक्षात घेऊन यामध्ये आरामदायी सीट बसवण्यात आली आहे. तसेच यामध्ये ट्रिपल हेड लॅम्पचा वापर करण्यात आला आहे.
कोमाकी रेंजर क्रूजर मोटारसायकल 26 जानेवारीपासून कोमाकी डीलरशिपवर उपलब्ध होईल. या बाईकची एक्स शोरुम किंमत 1.68 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
तर बातम्या
शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार
Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार
(Komaki Ranger, India’s first electric cruiser bike launched at 1.68 lakh rupees price)