मुंबई : भारतीय बाजारपेठेत सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक नवीन कारला इथल्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझा (Suzuki Vitara Brezza) आणि टाटा नेक्सॉन (Tata Nexon) या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री करणाऱ्या या वाहनांपैकी काही आहेत. या दोन्ही कारच्या 10,000 युनिट्सची दर महिन्याला सरासरी विक्री होते. आज आम्ही तुम्हाला Mahindra XUV300बद्दल सांगणार आहोत. या कारचे 4-5 हजार युनिट्स दर महिन्याला विकले जातात. भारतीय बाजारपेठेत सर्व स्पर्धक कार नवीन वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानासह सादर केल्या गेल्या असताना, महिंद्रा लवकरच XUV300चे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणू शकते. 2022 महिंद्रा XUV300ला या सेगमेंटमध्ये टक्कर देणार आहे.
डिझाइनमध्ये बदल
फेसलिफ्ट म्हणून छोट्या एसयूव्हीमध्ये फारसे बदल अपेक्षित नाहीत. या एसयूव्हीच्या डिझाइनमध्ये काही मोठे बदल केले जाऊ शकतात. या नवीन डिझाइनमुळे ही कार दिसायला आणखीनच आकर्षक होणार आहे आणि लूकबाबत ग्राहक नेहमीच चोखंदळ असतात. महिंद्रा ऑटोमोटिव्ह 2022च्या पहिल्या तिमाहीत नवीन XUV300 फेसलिफ्ट भारतात लॉन्च करू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.
नवीन बंपर
नवीन XUV300 फेसलिफ्टच्या रेंडरमध्ये वेगळे डिझाइन ग्रील आणि नवीन बंपर दिसले आहेत. अद्ययावत SUV 17 इंच अॅलॉय व्हील, नवीन हेडलॅम्प आणि टेललॅम्प क्लस्टर व्यतिरिक्त नवीन रंगांसह ऑफर केली जाऊ शकते. याचं श्रेय महिंद्राचे नवीन चीफ डिझाइन ऑफिसर प्रताप बोस यांना जातं. काही काळापूर्वी टाटा मोटर्समधून ते महिंद्रात रुजू झालेत. सध्याची XUV300ची एक्स-शोरूम किंमत 7.96 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.36 लाख रुपयांपर्यंत जाते.
6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स
सुरक्षेसाठी यात 7 एअरबॅग्ज, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल आणि पार्किंग सेन्सर दोन्ही बाजूस मिळू शकतात. नवीन XUV300 पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल असेल आणि 1.2-लिटर 3-सिलेंडर Amstallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह ती मिळणार आहे. हे इंजिन 130 Bhp पॉवर आणि 230 Nm पीक टॉर्क बनवतं आणि कंपनी सहसा या इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देऊ शकते.