मुंबई : महिंद्राने ऑलिम्पिक पदक विजेता सुमित अंतिलला Mahindra XUV700 भेट दिली आहे. कंपनीने नुकतीच याची घोषणा केली आहे. तसेच ट्विटरवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. सुमित अंतिलने 2020 समर पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. (Mahindra first XUV700 Javelin Gold Edition SUV delivered to Olympian Sumit Antil)
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी यापूर्वी घोषणा केली होती की 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्यांना XUV700 ची जॅव्हलिन आवृत्ती भेट दिली जाईल. XUV700 ची Javelin Edition SUV नीरज चोप्रा आणि अवनी लेखरा यांना भेट म्हणून दिली जाईल. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक/पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यात या तिघांना यश आले.
Our exhilaration is off the charts as we deliver the first-ever personalized XUV700 to @sumit_javelin, who made the whole nation proud at Tokyo Paralympics. Once again, thank you for bagging the gold for India. #XUV700 #HelloXUV700 #DeliveringTheRush pic.twitter.com/XNpTKt6TVF
— MahindraXUV700 (@MahindraXUV700) October 30, 2021
XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.
एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.
XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.
XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.
इतर बातम्या
2021 Bajaj Pulsar 250 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
झिरो डाऊन पेमेंट, परवडणारे हप्ते, दिवाळीला घरी घेऊन या जबदस्त फिचर्स असणारी महिंद्राची SUV
(Mahindra first XUV700 Javelin Gold Edition SUV delivered to Olympian Sumit Antil)