Scorpio, Bolero आणि Alturas सह महिंद्राच्या अनेक गाड्यांवर 82000 रुपयांपर्यंत सूट, स्वस्तात कार खरेदीची शेवटची संधी

| Updated on: Nov 16, 2021 | 2:42 PM

Mahindra and Mahindra ने नोव्हेंबर 2021 साठी त्यांच्या निवडक मॉडेल्सवर आकर्षक बेनिफिट जाहीर केले आहेत. या ऑफर निवडक SUV वर 30 नोव्हेंबरपर्यंत वैध आहेत आणि वेगवेगळ्या डीलरशिप्सवर वेगवेगळ्या असू शकतात.

Scorpio, Bolero आणि Alturas सह महिंद्राच्या अनेक गाड्यांवर 82000 रुपयांपर्यंत सूट, स्वस्तात कार खरेदीची शेवटची संधी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : Mahindra and Mahindra ने नोव्हेंबर 2021 साठी त्यांच्या निवडक मॉडेल्सवर आकर्षक बेनिफिट जाहीर केले आहेत. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिेलेल्या तपशीलांनुसार, इंडियन यूटिलिटी व्हीकल मेकर आपल्या SUV वर 81,500 रुपयांपर्यंतचे आकर्षक बेनिफिट देत आहे. यामध्ये रोख सवलत, आर्थिक लाभ, कॉर्पोरेट सूट आणि अतिरिक्त ऑफर यांसारख्या बेनिफिट्सचा समावेश आहे. याचा अर्थ दिवाळी संपली असली तरी, तुम्हाला अजूनही उत्तम ऑफर्ससह महिंद्रा कार खरेदी करण्याची संधी आहे. (Mahindra giving discounts up to 82000 rupees on selected models )

या ऑफर निवडक SUV वर 30 नोव्हेंबरपर्यंत वैध आहेत आणि वेगवेगळ्या डीलरशिप्सवर वेगवेगळ्या असू शकतात. या ऑफर महिंद्रा थार, बोलेरो निओ आणि XUV700 वर लागू नाहीत. KUV100 NXT ही कार 61,055 रुपयांपर्यंतच्या एकूण बेनिफिट्ससह वेबसाइटवर सूचीबद्ध केली आहे. यामध्ये 38,055 रुपयांपर्यंत रोख सूट, 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओवर 32,320 रुपयांची सूट

Mahindra Scorpio वर एकूण 32,320 रुपयांपर्यंतची सूट आहे. यामध्ये अनुक्रमे 15,000 रुपये, 4,000 रुपये आणि 13,320 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट्स, कॉर्पोरेट ऑफर आणि इतर ऑफर समाविष्ट आहेत.

Mahindra Alturas G4 SUV वर डिस्काउंट

Mahindra Alturas G4 SUV वर एकूण 81,500 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. यामध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 20,000 रुपयांपर्यंतच्या इतर ऑफर्सचा समावेश आहे. भारतीय कार निर्माता XUV300 सबकॉम्पॅक्ट SUV वर 49,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे. यामध्ये 15,000 रुपयांपर्यंतची कॅश ऑफर, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,500 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. ग्राहक एसयूव्हीवर 5,000 रुपयांपर्यंतच्या इतर ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

Mahindra Marazzo आणि Bolero वर शानदार ऑफर

Mahindra Marazzo MPV या महिन्यात 40,200 रुपयांच्या कमाल सूटसह विक्रीसाठी सज्ज आहे. ग्राहक 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांचे एक्सचेंज बेनिफिट आणि 5,200 रुपयांच्या कॉर्पोरेट ऑफरचा लाभ घेऊ शकतात. महिंद्रा बोलेरो एकूण 13,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी केली जाऊ शकते ज्यामध्ये 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आणि 3,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफर समाविष्ट आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Mahindra giving discounts up to 82000 rupees on selected models )