तुम्ही तरुण मंडळींना विचारलं कोणती गाडी हवी तर अनेक लोक स्कॉर्पिओ हीच पहिली आवड सांगतील. कारण, स्कॉर्पिओची डिझाईन आणि लूक भल्याभल्यांना भाळतो. सध्या महिंद्रा अँड महिंद्राच्या मिडसाईज एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक सध्या भारतात धुमाकूळ घालत आहेत.
भारतात मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटची वाहने चांगली विकली जात असून ह्युंदाई क्रेटानंतर दुसरी सर्वात लोकप्रिय कार स्कॉर्पिओ आहे. महिंद्राच्या स्कॉर्पिओ सीरिजमध्ये स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक अशी दोन मॉडेल्स असून ती अनेक आकर्षक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
आजकाल कार खरेदीदार रंगावर खूप भर देतात, ज्यामुळे कंपन्याही आपल्या कार आणि एसयूव्हीला अनेक कलर ऑप्शनमध्ये ऑफर करतात. आज आम्ही तुम्हाला स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिकच्या सर्व कलर ऑप्शनबद्दल सांगतो.
महिंद्रा स्कॉर्पिओ-एनच्या किंमत आणि स्पेशालिटीबद्दल जाणून घ्या. महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची एक्स-शोरूम किंमत 13.85 लाख रुपयांपासून 24.54 लाख रुपयांपर्यंत आहे. तर स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत 13.62 लाख रुपयांपासून 17.42 लाख रुपयांपर्यंत आहे. या एसयूव्हीमध्ये 2000 सीसीपासून 22 सीसीपर्यंत पेट्रोल आणि डिझेल इंजिन आहे, जे पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप जबरदस्त आहे. लूक आणि फीचर्सच्या बाबतीत या महिंद्रा एसयूव्ही खूप अॅडव्हान्स झाल्या असून त्या चालवायला अगदी सोप्या आणि कम्फर्टेबल झाल्या आहेत.
तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर महिंद्रा अँड महिंद्राच्या मिडसाईज एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक सध्या भारतात धुमाकूळ घालत आहेत. स्कॉर्पिओ खरेदीसाठी वरील माहिती तुमच्या उपयोगात येऊ शकते.