अवघ्या 7.95 लाखात खरेदी करा Mahindra ची शानदार SUV, फीचर्सच्या बाबतीत अव्वल

| Updated on: Apr 30, 2021 | 3:48 PM

भारतात महिंद्राच्या (Mahindra) गाड्यांचं वेगळे स्टेटस निर्माण झालं आहे. या कंपनीची वाहने सर्वात सुरक्षित आणि दमदार मानली जातात.

अवघ्या 7.95 लाखात खरेदी करा Mahindra ची शानदार SUV, फीचर्सच्या बाबतीत अव्वल
Mahindra Xuv300
Follow us on

मुंबई : भारतात महिंद्राच्या (Mahindra) गाड्यांचं वेगळे स्टेटस निर्माण झालं आहे. या कंपनीची वाहने सर्वात सुरक्षित आणि दमदार मानली जातात. XUV असो की SUV, बहुतेकजण लांबच्या प्रवासासाठी महिंद्राच्या वाहनाची निवड करतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासमोर अशी कार घेऊन आलो आहोत, जी तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. होय, आम्ही महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV300) या कारबद्दल बोलत आहोत. ही एक दमदार एसयूव्ही आहे जिला 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे. (Mahindra SUVs can bought for only 7.95 lakhs, features are not less than anyone)

Mahindra XUV300 च्या टॉप एंड ऐवजी तुम्ही या कारच्या बेस मॉडलची निवड करत असाल तर तुम्हाला ही गाडी खूपच स्वस्तात मिळेल. तुम्ही या कारचं बेस मॉडल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही कार 7 लाख 95 हजार 293 रुपयांमध्ये मिळेल. यामध्ये तुम्हाला सर्व गरजेजे फीचर्स मिळतील जे या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये आहेत.

दमदार इंजिन

या कारच्या बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला 4 डिस्क ब्रेक, स्मार्ट स्टीयरिंग सिस्टम आणि पॉवर विंडो मिळेल. या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 1197 सीसीचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5000 आरपीएम आणि 108.59 एचपीवर काम करतं. त्याच वेळी, हे इंजिन 2000 आणि 3500 आरपीएमवर 200Nm टॉर्क देते. येथे आपल्याला 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल. या कारमध्ये 5 प्रवासी आरामात बसू शकतात.

केबिन फीचर्स

या कारच्या केबिनमधील वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये अॅडजस्टेबल फ्रंट सीट बेल्ट्स, 4 स्पीकर्स, सेंटर रुफ लँप, इलेक्ट्रिक टेलगेट रीलीझ, 12 व्ही अॅक्सेसरी सॉकेट, HVAC जे इलेक्ट्रॉनिकरित्या ऑपरेट केले गेले आहे, टच स्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि इतर वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. किंमतीच्या बाबतीत, महिंद्रा एक्सयूव्ही 300 बाजारात Kia Sonet व्यतिरिक्त Renault Kiger सारख्या कार्सना जोरदार टक्कर देत आहे.

सुरक्षिततेच्या बाबतीत अव्वल

GNCAP क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट प्रोटेक्शनच्या बाबतीत या कारला 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तर लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत या कारला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

बंपर ऑफर : XUV500 ते Maruti Baleno, ‘या’ 8 गाड्यांवर 85,800 रुपयांपर्यंतची सूट

नव्या अवतारात 2021 Renault Triber MPV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Mahindra SUVs can bought for only 7.95 lakhs, features are not less than anyone)