Mahindra Thar Roxx vs Thar : थारच्या दोन्ही मॉडल्समध्ये किती फरक? किंमत ते फिचर पर्यंत जाणून घ्या, सर्वकाही

| Updated on: Aug 20, 2024 | 2:31 PM

Thar Roxx vs 3 Door Thar : जुनी थार की पाच दरवाजावाली नवीन थार? कुठली SUV विकत घेणं फायद्याच. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी दोन्ही मॉडल्समध्ये किती फरक आहे? ते समजून घेणं आवश्यक आहे. दोन्ही मॉडल्सच्या किंमतीपासून फिचरपर्यंत किती फरक आहे, ते समजून घ्या.

Mahindra Thar Roxx vs Thar : थारच्या दोन्ही मॉडल्समध्ये किती फरक? किंमत ते फिचर पर्यंत जाणून घ्या, सर्वकाही
Mahindra Thar Roxx vs Thar
Follow us on

महिंद्राची 5 दरवाजांची Thar ROXX मार्केटमध्ये ग्राहकांसाठी लॉन्च झालीय. लवकरच कंपनी या SUV ची बुकिंग सुरु करणार आहे. पण 5 डोरची थार बुक करण्याआधी तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की, 3 Door Thar आणि नव्या 5 डोर थार रॉक्स, हे दोन्ही मॉडल्स परस्परापेक्षा किती वेगळे आहेत, त्यात काय फरक आहे?. तुम्ही नवीन 5 दरवाजाची थार रॉक्स किंवा जुनी महिंद्रा थार खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर तुम्हाला दोन्ही मॉडल्समधला फरक समजून घेतला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला चांगली कार निवडता येईल. दोन्ही गाड्यांची किंमत, सेफ्टी फिचर्स, इंजिन आणि डायमेंशनमध्ये किती फरक आहे ते समजून घ्या.

MX1 वेरिएंटची किंमत 12.99 लाख (पेट्रोल-मॅनुअल, एक्स-शोरूम), डीजल वेरिएंटची किंमत 13.99 लाख , एक्स-शोरूम आहे. MX3 वेरिएंटची किंमत 14.99 लाख (पेट्रोल-ऑटोमॅटिक, एक्स-शोरूम) तेच डीजल वेरिएंटसाठी 1 लाख रुपये जास्त खर्च करावे लागतील. डीजल वेरिएंटची किंमत 15.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.

Mahindra Thar Roxx Price : जाणून घ्या प्रत्येक वेरिएंटची किंमत

AX3 L (मॅनुअल) आणि MX वेरिएंटची (मॅनुअल) किंमत 16.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. AX5 L (ऑटोमॅटिक) आणि AX7 L (मॅनुअल) या दोन्ही वेरिएंट्ससाठी 18.99 लाख खर्च (एक्स-शोरूम) करावे लागतील. दुसऱ्याबाजूला जुन्या 3 डोर थारची किंमत 11 लाख 50 हजार रुपये (एक्स-शोरूम) ते 17 लाख 50 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे.

सेफ्टी फीचर्समध्ये किती फरक?

थार रॉक्समध्ये ग्राहकांच्या सेफ्टीसाठी ADAS लेवल-2, 6 एयरबॅग्स , ESC (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल), हिल डिसेंट कंट्रोल, एंटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, हाइड्रोलिक ब्रेक असिस्ट, ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल आणि व्हीकल डायनेमिक्स कंट्रोल सारखे भरपूर फिचर्स आहेत.

दुसऱ्याबाजूला जुन्या थारमध्ये सेफ्टीसाठी 2 एयरबॅग्स देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अपहिल-डाउनहिल कंट्रोल, रियर पार्किंग सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ABS आणि ISOFIX चाइल्ड सीट सपोर्ट देण्यात आलाय.

लांबी-रुंदीमध्ये किती फरक?

थार रॉक्सची लांबी 4428mm तर थारची लांबी 3985mm आहे. रॉक्सची रुंदी 1870mm तर थारची रुंदी 1820mm आहे. थार रॉक्सची उंची 1923mm तेच थारची उंची 1855mm आहे.

इंजिनमध्ये किती फरक?

थार रॉक्समध्ये 2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. त्यातून 159bhp पावर जेनरेट होते. 2.2 लीटर डीजेल इंजिन 150bhp पावर जेनरेट करण्यास सक्षम आहे. 3 डोर थारमध्ये 2.2 लीटर डीजेल, 1.5 लीटर डीजेल आणि 2.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे. एसयूवी मॅनुअल आणि ऑटोमॅटिक टॉर्क कंवर्टर ऑप्शन मिळतो.

Mahindra Thar Roxx Booking ची डिलीवरी डिटेल

थार रॉक्सची बुकिंग 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल. या एसयूवीच्या डिलीवरीसाठी तुम्हाला दसरा 2024 पर्यंतची वाट पहावी लागेल.