Mahindra Thar | जानेवारी 2023 मध्ये Auto Expo च आयोजन करण्यात आलं होतं. त्यात Maruti Suzuki Jimny ची ग्रँड एंट्री झाली. मारुतीसाठी हा क्षण खूप खास होता. कारण त्यांच्या लाइनअपमध्ये एक नवीन ऑफ रोड SUV दाखल होणार होती. दुसऱ्याबाजूला या ग्रँड एंट्रीमुळे थोडी धाकधूकही होती. मारुतीच्या नवीन कारपासून महिंद्राच्या थारला थेट धोका होता. मारुतीची नवीन SUV थारचा मार्केट शेअर कमी करणार असं बोलल जात होतं. आकड्यांवर नजर टाकली, तर जिम्नीची हालत फार चांगली नाहीय. थार अजूनही आपल स्थान टिकवून आहे.
नोव्हेंबर 2023 चे आकडे पाहिले, तर जिम्नीच्या विक्रीमध्ये जवळपास 45 टक्के घसरण झालीय. सुरुवातीला या कारसाठी भरभरुन बुकिंग झाली होती. पण मागच्या काही महिन्यांपासून या कारला ग्राहक मिळत नाहीयत. मागच्या महिन्यात जिम्नीच्या फक्त 1,020 यूनिट्सची विक्री झाली. तेच महिंद्रा थारच्या 5,810 यूनिट्स विकल्या गेल्या. जिम्नीच्या विक्रीत घसरण का झाली? ते जाणून घ्या.
Thar vs Jimny: कशी मागे पडली मारुतीची जिम्नी
महिंद्र थार अनेक बाबतीत मारुतीच्या जिम्नीपेक्षा सरस आहे. जिम्नी आल्यानंतरही थार आपला दबदबा कसा टिकवून आहे, ते समजून घेऊया.
Size : महिंद्रा थार साइजच्या बाबतीत मारुती जिम्नीपेक्षा मोठी आहे. थारचा रोड प्रेजेन्सही जिम्नीपेक्षा दमदार आहे. थारच्या तुलनेत जिम्नी रुंदी आणि उंची कमी आहे. त्याशिवाय थारचा ग्राऊंड क्लियरन्सही जास्त आहे.
Engine : मारुति जिम्नी एक इंजिन 1.5 लीटर नेच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते. तेच महिंद्रा थारवर 1.5 लीटर डीजल इंजिन, 2.2 लीटर डीजल इंजिन आणि 2.0 लीटर पेट्रोल इंजिन येतं. ग्राहकांना आपल्या गरजेच्या हिशोबाने पर्याय मिळतात.
Roof : जिम्नीची लोकप्रियता कमी होतेय, त्यामागे महिंद्रा थारच्या छताचा सुद्धा हात असू शकतो. ऑफ-रोड एसयूवी खरेदी करणाऱ्या कस्टमर्सची सॉफ्ट-टॉप रूफला पसंती असते. हा पर्याय थारमध्ये मिळतो. जिम्नीच हार्डटॉप रूफ आहे. थारमध्ये सुद्धा हा ऑप्शन आहे.
थार सरस का? किंमत
भारतात आजही जुन्या जीपला पंसती देणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. महिंद्रा थार जीपचा वारसा पुढे चालवतेय. आजच्या जमान्यात कोणाला जीप घ्यायची असेल, तर त्याची पसंती थारला आहे. त्याशिवाय किंमतही एक कारण आहे.
महिंद्रा थारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.98 लाख रुपये आहे. दुसऱ्याबाजूला, मारुती जिम्नीची स्टार्टिंग एक्स-शोरूम प्राइस 12.74 लाख रुपये आहे. मारुतीने अलीकडेच लिमिटेड पीरियडसाठी Jimny Thunder Edition काढलं, ज्याची एक्स-शोरूम किंमत 10.74 लाख रुपये आहे.