मुंबई : सध्या भारतीय ऑटोमोबाईलमध्ये (Automobile) चलतीचे दिवस सुरु आहेत. जवळपास सर्वच सेगमेंटमधील कार्सला ग्राहकांकडून चांगली मागणी वाढली आहे. खासकरुन नवीन लाँच होत असलेल्या गाड्यांना अधिक बुकिंग मिळत आहे. त्यातच सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्याच्या सारख्या अनेक कारणांमुळे कार निर्मात्या कंपन्या ग्राहकांच्या मागणीऐवढा गाड्यांचा पुरवठा करण्यास अकार्यक्षम ठरत आहेत. यामुळे जर तुम्ही एखाद्या गाडीची बुकिंग (Booking) करत असाल तर ती गाडी तुम्हाला अनेक महिन्यांनी मिळू शकते. अनेक गाड्या अशाही आहेत, ज्यांच्यासाठी ग्राहकांना एक वर्षाहुन अधिक कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जुलै 2022 मध्ये पाहिले तर, अनेक लोकप्रिय मॉडेल्सचा प्रतीक्षा कालावधी (waiting period) हा 4 महिन्यांपासून ते 22 महिन्यांपर्यंतचा आहे. या लेखातून जाणून घेउया कोणत्या कारचा किती प्रतीक्षा कालावधी आहे.
भारतात विक्री होत असलेल्या सर्वच कार्समध्ये महिंद्रा एक्सयुव्ही 700 ला सर्वांधिक प्रतीक्षा कालावधी आहे. जर तुम्ही देखील महिंद्रा एक्सयुव्ही 700 खरेदी करणार असाल तर, तुम्हाला काही व्हेरिएंटच्या डिलीव्हरीसाठी जवपास दोन वर्ष वाट पहावी लागणार आहे. दुसरीकडे महिंद्रा थारचा प्रतीक्षा कालावधीदेखील काही व्हेरिएंटसाठी जवळपास एक वर्षांचा आहे.
देशात महिंद्रा एक्सयुव्ही 700 आणि महिंद्रा थारला मोठी मागणी वाढली आहे. नुकत्याच लाँच झालेल्या महिंद्रा स्कॉर्पियो एन देखील लवकरच प्रतीक्षा कालावधीमध्ये एक्सयुव्ही 700 आणि महिंद्रा थारला मागे टाकेल अशी शक्यता आहे. किआ करेंस देखील नुकतीच लाँच झाली असून त्याच्या काही व्हेरिएंटसाठी ग्राहकांना एक वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आहे. परंतु जास्त करुन गाड्यांचा प्रतीक्षा कालावधी हा तीन ते पाच महिन्यांपर्यंतचा आहे.
(कार, प्रतीक्षा कालावधी)
मारुती अर्टिगा देशातील सर्वाधिक जास्त विकली जाणारी एमपीव्ही आहे. याच्या बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये 5 ते 7 महिन्यांचे अंतर आहे. याच्या सीएनजी व्हेरिएंटला अधिकच मागणी आहे. सीएनजी व्हेरिएंटचा वेटिंग पीरिएड 7 ते 9 महिन्यांपर्यंत आहे. दुसरीकडे ह्युंदाई क्रेटाचा डिलिव्हरीसाठीचा प्रतीक्षा कालावधी 4 ते 7 महिन्यांचा आहे.