Mahindra XUV700 च्या 14000 डिलीव्हरींचा टप्पा पार, जाणून घ्या कारची खासियत

| Updated on: Jan 26, 2022 | 5:51 PM

महिंद्राने (Mahindra) गेल्या वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) XUV700 ही कार लाँच केली होती. बुधवारी, देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी, महिंद्राने पुष्टी केली की, त्यांनी देशभरातील ग्राहकांना XUV700 च्या 14,000 युनिट्स वितरित करण्याचे लक्ष्य गाठले आहे.

Mahindra XUV700 च्या 14000 डिलीव्हरींचा टप्पा पार, जाणून घ्या कारची खासियत
Mahindra Xuv700 (PS- Mahindra)
Follow us on

मुंबई : महिंद्राने (Mahindra) गेल्या वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) XUV700 ही कार लाँच केली होती. बुधवारी, देशाच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी, महिंद्राने पुष्टी केली की, त्यांनी देशभरातील ग्राहकांना XUV700 च्या 14,000 युनिट्स वितरित करण्याचे लक्ष्य गाठले आहे. XUV700 हे 2021 मध्ये भारतीय कार बाजारपेठेतील (Indian Automobiles Market) सर्वात मोठं लॉन्चिंग होतं. या 3 रो SUV ला आकर्षक लुक, फीचर-पॅक्ड केबिन, पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय मिळतात. महिंद्राच्या या कारला ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहेत. मागणी मोठी आणि तुलनेने उत्पादन धिम्या गतीने सुरु असल्यामुळे या कारचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरियड) खूप मोठा झाला आहे.

XUV700 चे आतील लेआउट उत्तम आहे, सॉफ्ट-टच मटेरियल आणि क्रोम अॅक्सेंटचा वापर केबिनला आणखी उत्कृष्ट बनवतो. मध्यभागी 10.25 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध आहे. XUV700 मध्ये सोनी 3D साउंड सिस्टीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एअर फिल्टर, अॅम्बियंट लायटिंग, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एसी, पॉवर्ड फ्रंट सीट, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल आणि पॅनारोमिक सनरूफ सारखे फीचर्स यात आहेत.

एसयूव्ही कनेक्टेड कार टेक्नोलॉजी आणि अमेझॉन अलेक्सा कॉम्पॅटिबिलिटीसाठी अॅड्रेनॉक्स सूट सादर करते. जे व्हॉईस कमांड वापरून सनरूफ ऑपरेट करू शकते. XUV700 चार ड्रायव्हिंग मोडसह येते, ज्यात Zip, Zap, Zoom आणि Custom मोड्सचा समावेश आहे. XUV700 चे एक स्मार्ट वैशिष्ट्य म्हणजे एंट्रीसाठी पुढील सीट आपोआप मागे घेतली जाते.

सेफ्टी फीचर्स

XUV700 मध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्स, ABS, EBD, हिल-होल्ड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्सिंग कॅमेरा, 360 डिग्री साराऊंड व्ह्यू इत्यादी सेफ्टी फीचर्स मिळतात. यासह, एसयूव्हीला ऑटो-बूस्टर हेडलॅम्प (जे ऑटोमॅटिक रुपात हेडलॅम्प्स थ्रो आणि इंटेन्सिटी वाढवतात.), ड्रायव्हर स्लीप डिटेक्शन, पर्सनल सिक्योरिटी अलर्ट सारख्या अनेक सेगमेंट-फर्स्ट सेफ्टी फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.

इंजिन

XUV700 टर्बो पेट्रोल इंजिन आणि डिझेल पॉवरप्लांटच्या निवडीसह उपलब्ध आहे. पेट्रोल युनिट 2.0 लीटर mStallion युनिट आहे, जे नवीन थार मध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 198 bhp पॉवर आणि 380 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन mHawk इंजिन आहे जे 182 बीएचपी पॉवर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत. XUV700 मध्ये 4X4 पॉवरट्रेनचा पर्याय देखील आहे.

इतर बातम्या

शानदार ऑफर! Maruti Suzuki Alto कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

Mahindra ची Hero Electric सोबत भागीदारी, दरवर्षी 10 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार

(Mahindra XUV700 hits milestone of 14,000 deliveries after launch)