XUV400: महिंद्राच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUVचं काउंटडाउन सुरू; फुल चार्जवर 400 किमीची रेंज

| Updated on: Aug 30, 2022 | 12:33 PM

महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी पाच नवीन इलेक्ट्रिक SUV व्हेरिएंटचे अनावरण केले आहे. कंपनी 2024 मध्ये या एसयुव्ही लाँच करण्यास सुरुवात करेल. 8 सप्टेंबर रोजी महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची घोषणा महिंद्राने केली आहे.

XUV400: महिंद्राच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUVचं काउंटडाउन सुरू; फुल चार्जवर 400 किमीची रेंज
Mahindra XUV400: महिंद्राच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUVचं काउंटडाउन सुरू
Image Credit source: Twitter
Follow us on

भारतीय एसयुव्ही कार बनविण्यात महिंद्राचा हातखंडा आहे. एसयुव्ही कार स्पेशलिस्ट महिंद्रा आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric SUV) कार XUV400 लाँच करण्यासाठी तयार आहे. 8 सप्टेंबर से महिंद्रा XUV400 ची विक्री सुरू करु शकते. अपकमिंग इलेक्ट्रिक एसयूवी XUV300 सबकॉम्पेक्ट एसयुव्हीचे (Subcompact SUV) इलेक्ट्रिक वर्जन आहे. भारतात या कारची सरळ स्पर्धा टाटा नेक्सॉन (Tata Nexon) ईवी मैक्सशी होणार आहे. महिंद्रा XUV400 ही अपकमिंग कार 4.2 मीटर लांब आहे यात कंपनीकडून चांगला बूट स्पेस देण्यात आला आहे. महिंद्राच्या न्यू इलेक्ट्रीक एसयुव्ही कारला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ती 400 किमीपर्यंतची रेंज मिळवू शकते. ही कार पहिल्यांदा 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली गेली होती.

Nexon सोबत होणार स्पर्धा

महिंद्रा XUV400 इलेक्ट्रिक एसयुव्ही XUV100 प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. कंपनीने यात एलजी केमच्या हाय-एनर्जी-डेंस एनएमसी बॅटरीचा वापर केला आहे. ऑटो वेबसाइट इंडिया कार न्यूजनुसार कंपनीचा दावा आहे, की त्याचा सेल टाटा नेक्सॉन ईवी वापरणारे सिलंडरिकल एलएफपी सेल अधिक वाढतात. NMC बॅटरी कार जास्त पावर आणि लांब रेंज देते.

XUV400 डिझाइन

महिंद्राची अपकमिंग इलेक्ट्रिक कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये पहिल्यांदा समोर आली होती. त्याचे फायनल व्हर्जनचे बहुतेक डिझाईन कॉन्सेप्ट सारखेच आहे. दरम्यान, फ्यूल बेस्ड एसयुव्हीपेक्षा वेगळे दिसण्यासाठी न्यू इलेक्ट्रीक एसयुव्हीमध्ये काही बदल केले आहेत. XUV400 मध्ये क्लोज-ऑफ क्रेडिटग्रिल, इंटिग्रेटेड डीआरएल सोबत नवीन डिझाईनचे हेडलॅम्प्स आणि न्यू टेललॅंप कल्स्टर देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

XUV400 चे इंटेरियर

महिंद्रा XUV400 इंटीरियरमध्ये स्वत:च्या ब्रॅंडचा अॅड्रेनो एक्स कनेक्टेड कार एआय टेक्नोलॉजीसह एक मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, न्यू इलेक्ट्रिक एसयूवी कार अडवांस्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (एडीएएस) टेक्नोलॉजी उपलब्ध आहे. महिंद्राने 15 ऑगस्टला कंपनी INGLO EV Sketboard प्लेटफॉर्मवर बेस्ड पाच इलेक्ट्रीक एसयूव्ही कॉन्सेप्ट समोर आणले होते.