मुंबई : आजकाल अनेक गाड्या आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने येत आहेत. ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येणाऱ्या कार रहदारीच्या परिस्थितीत अतिशय कार्यक्षम असतात आणि चालविण्यास त्रासमुक्त असतात, पण सध्या रस्त्यावर मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या गाड्या भरपूर आहेत. ही कार चालवताना अनेकजण काही चुका (Gear Shifting tips) करतात. ज्याचा परिणाम गाडीच्या इंजिन प्रणालीवर पडतो. परिणामी गाडीची रिसेल व्हलूही कमी होते. जर तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशन कार चालवत असाल तर या पाच गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
साधारणपणे, बहुतेक लोकांना एका हात स्टीयरिंग व्हीलवर आणि दुसरा हात गियर लीव्हर किंवा शिफ्टरवर ठेवण्याची सवय असते. जरी वारंवार गियर बदलण्याच्या परिस्थित वेगळी गोष्ट आहे, मात्र काहीजण साधारण परिस्थितीतही हिच पद्धत वापरतात, यामुळे नकळत गेअरवर प्रेशर येते. अशा सवयीमुळे गियर बॉक्स खराब होण्याची शक्यता वाढते. गीअरवर थोडासा दाब आल्याने गिअरबॉक्स खराब होऊ शकतो. स्टीयरिंग व्हीलवरील तुमचे हात घड्याळात साडेनऊ किंवा साडेतीन स्थितीत असले पाहिजेत.
काही लोकांना गाडी चालवताना क्लचवर पाय ठेवण्याची सवय असते. ते गीअर्स त्वरीत बदलण्यास सक्षम होण्यासाठी हे करतात. पण जर तुम्हाला ही सवय असेल तर लगेच सोडा. असे करणे तुमच्या खिशाला भारी पडू शकते. या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला लवकरच क्लच प्लेट बदलावावी लागू शकते. तुमचा पाय क्लचवर ठेवण्याचा हाही तोटा आहे की जेव्हा तुम्हाला अनैच्छिकपणे ब्रेक लावावा लागतो तेव्हा तुमचे अवचेतन मन ब्रेक लीव्हरऐवजी क्लच लीव्हर दाबते, ज्यामुळे अपघात होऊ शकतो.
उतारावर जाताना काही लोकं वाहन न्यूट्रलमध्ये ठेवतात. खाली जाताना गिअरची गरज नाही असा विचार करून इंधनाची बचत होते असे त्यांना वाटते, पण हे तंत्र पूर्णपणे चुकीचे आहे. न्यूट्रलमध्ये गाडी चालवताना, वाहनावर इंजिनचे नियंत्रण नसते आणि त्यामुळे ब्रेकही जास्त गरम होतात. उतारावरून उतरताना गाडी गिअरमध्ये ठेवणे चांगले, जेणेकरून गरज पडल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येईल.
काही लोकं आरपीएम मीटरला केवळ शोपीस मानतात, परंतु तुमची कार हे इंजिन आणि तुमची ड्रायव्हिंग सवय यांच्यातील दुवा आहे, म्हणजेच तुम्ही आरपीएमद्वारे इंजिनची कार्यक्षमता जाणून घेऊ शकता. जास्त आरपीएम म्हणजे तुम्ही इंजिनला आवश्यकतेपेक्षा जास्त लोड देत आहात. रेसींग कार प्रमाणे गेअर शिफ्ट करण्याची ही सवय दीर्घकाळात इंजिन तसेच गिअरबॉक्स खराब करू शकते. त्यामुळे कमी आरपीएमवरच गियर बदला.