मारुतीची नवीन कार लॉन्च, 53 रुपयांमध्ये 36 किलोमीटरचं मायलेज
मारुती सुझुकीने सोमवारी एक नवीन कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. मारुती सुझुकी सेलेरियो एस सीएनजी टेक्नॉलॉजी असे या कारचे नाव असून ही कार सीएनजी इंधनावर धावते.
1 / 5
मारुती सुझुकीने सोमवारी एक नवीन कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. मारुती सुझुकी सेलेरियो एस सीएनजी टेक्नॉलॉजी असे या कारचे नाव असून ही कार सीएनजी इंधनावर धावते.
2 / 5
Maruti Suzuki Celerio S-CNG ची किंमत 6.58 लाख रुपये (एक्स शो रूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे. मारुती सुझुकी सेलेरियोची ही सीएनजी कार VXi ट्रिमवर आधारित आहे.
3 / 5
मारुती सुझुकी सेलेरियो एस सीएनजीच्या मायलेजबद्दल बोलताना कंपनीने दावा केला आहे की, ही कार 36.60 किमी प्रति किलो मायलेज देऊ शकते. दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 53 रुपये किलो इतकी आहे.
4 / 5
सीएनजी व्हेरियंटमधील ही लोकप्रिय कार त्याच डिझाइन आणि फीचर्ससह येते. यामध्ये केवळ कंपनीचे सीएनजी सिलिंडर बसवण्यात आले आहे.
5 / 5
यामधील इंजिन 1.0 लीटर ड्युअल जेट ड्युअल VVT K सिरीज इंजिनसह सुसज्ज आहे, जे 60 लीटर क्षमतेच्या CNG टँकसह येते.